Join us

Wedding Bells : मौनी रॉय आणि सूरज नांबियारचे लग्न गोव्यात होणार, पाहुण्यांसाठी ठेवण्यात आली ही अट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 4:31 PM

मौनी रॉय (Mouni Roy) आणि सूरज नांबियार COVID-19 प्रोटोकॉलमुळे त्यांच्या पाहुण्यांच्या यादीत कपात करत आहेत.

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar)  काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री सूरज नांबियारसोबत २७ जानेवारी २०२२ रोजी कँडोलिम, गोव्यात लग्न करणार आहे. मात्र, कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता विवाहसोहळ्यासाठी मर्यादित लोकांनाच आमंत्रित केले जाणार आहे.

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, मौनी रॉय आणि सूरज नांबियार COVID-19 प्रोटोकॉलमुळे त्यांच्या पाहुण्यांच्या यादीत कपात करत आहेत. यासोबतच या जोडप्याने लग्नाला उपस्थित असलेल्या लोकांना आरटी-पीसीआर रिपोर्ट आणण्याची विनंती केली आहे.

रिपोर्टनुसार, सुरुवातीला मौनीच्या पाहुण्यांच्या यादीत 50 लोक होते. मात्र, अभिनेत्री आता तिच्या पाहुण्यांची यादी लहान केली आहे. कोव्हिड प्रोटोकॉलमुळे, अभिनेत्री तिच्या लग्नासाठी इंडस्ट्रीतील सर्व मित्रांना आमंत्रित करू शकत नाही. त्यामुळेच तिने ठरवले आहे की, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर ती मुंबईत एका ग्रँड रिसेप्शनचे देणार आहे.

कोण आहे सूरज नांबियार?मौनीच्या प्रियकराचं नाव सूरज नांबियार असं असून तो एक बॅकर आहे. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात मौनी तिच्या बहिणीच्या घरी दुबईमध्ये होती. त्याचवेळी तिची आणि सूरजची ओळख झाली. सध्या हे दोघ एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर मौनी अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे. जो तीन भागात बनवले आहे. चित्रपटाचा पहिला भाग ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि डिंपल कपाडिया यांच्याही भूमिका आहेत.

टॅग्स :मौनी राॅय