काळ्या रंगाच्या साडीत मौनी रॉय दिसली ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 08:14 PM2019-10-14T20:14:57+5:302019-10-14T20:15:21+5:30

छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मौनी लवकरच 'मेड इन चाइना' चित्रपटात झळकणार आहे.

Mouni Roy looks glamorous in a black saree, crazy after seeing the photos | काळ्या रंगाच्या साडीत मौनी रॉय दिसली ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी

काळ्या रंगाच्या साडीत मौनी रॉय दिसली ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी

googlenewsNext

छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मौनी लवकरच 'मेड इन चाइना' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत राजकुमार राव दिसणार आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. मौनी सोशल मीडियावर सक्रीय असून तिने काळ्या रंगाच्या साडीत फोटो शेअर केला आहे. या साडीतल्या फोटोतून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

मौनीने काळ्या रंगाच्या साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, साडी गर्ल फॉरेव्हर. 


मौनी काळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर व ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षावर होतो आहे. 


मौनी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. तिने तिच्या करियरची सुरूवात २००६ साली एकता कपूरची मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून केली होती. त्यासोबतच ती रिएलिटी शो 'जरा नच के दिखा'ची देखील विजेती आहे.


मौनी रॉय त्यावेळी चर्चेत आली जेव्हा तिने 'देवो के देव- महादेव' मालिकेत सतीची भूमिका केली होती. सतीच्या नावानं ती घराघरात प्रचलित झाली. त्यानंतर अचानक ती सुंदर दिसू लागले की लोक तिला पाहून चकीत झाले.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, मौनीने लिप आणि जॉची सर्जरी केली होती. पण तिने ही गोष्ट स्वीकारली नाही. तिचे आधीचे फोटो पाहून आपण अंदाज लावू शकतो. तिच्या लुकमधील बदलामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.


चित्रपटांबद्दल सांगायचं तर मौनीनं 'गोल्ड' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली. त्यानंतर ती  'केजीएफ' आणि 'रोमियो अकबर वॉल्टर'मध्ये दिसली.


याशिवाय ती 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात झळकणार आहे. 

Web Title: Mouni Roy looks glamorous in a black saree, crazy after seeing the photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.