Join us

Mouni Roy : मौनी रॉयने दाखवली आपल्या सुंदर घराची झलक, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 12:08 PM

Mouni Roy : याचवर्षी जानेवारीत मौनीने बिझनेसमॅन सूरज नाम्बियारसोबत लग्नगाठ बांधली. गोव्यात मौनी व सूरजचं धुमधडाक्यात लग्न झालं होतं. आता मौनी आपल्या पतीसोबत मुंबईच्या अलिशान घरात राहते...

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy ) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. याचवर्षी जानेवारीत मौनीने बिझनेसमॅन सूरज नाम्बियारसोबत लग्नगाठ बांधली. गोव्यात मौनी व सूरजचं धुमधडाक्यात लग्न झालं होतं. आता मौनी आपल्या पतीसोबत मुंबईच्या अलिशान घरात राहते.

सोशल मीडियावरचे मौनीचे अनेक ग्लॅमरस, बोल्ड फोटो तुम्ही पाहिले असतील. पण तिचं घर आतून कसं दिसतं? हे कधी पाहिलंय का? चला तर आज आम्ही तुम्हाला मौनीच्या अलिशान व सुंदर घराची एक झलक दाखवणार आहोत.मौनीचं घर आतून प्रचंड सुंदर आहे. घरात एक प्रशस्त लिव्हिंग रूम आहे. याठिकाणी मोठी टीव्ही स्क्रिन आहे. या लिव्हिंग रूममधली प्रत्येक गोष्ट तुमचं लक्ष वेधून घेईल. लॅम्प, कुशन, फर्निचर सगळं अगदी हटके आहे.

 

मौनीच्या घरातील सगळ्यात सुंदर जागा म्हणजे, तिचा आऊटडोर सीटिंग एरिया. या सीटिंग एरियातील हिरवळ, शानदार अरेंजमेंट सगळं काही जबरदस्त आहे. याठिकाणी बसून मौनी व सूरज निवांत वेळ घालवतात.मौनीचा किचर एरिया सुद्धा झक्कास आहे. व्हाईट व ब्लॅक शानदार कॉम्बिनेशनच्या या किचनचा कोपरा न कोपरा सुंदररित्या सजवलेला आहे.

मौनीच्या मते, घर म्हणजे निव्वळ राहण्याचं ठिकाण नाही तर याठिकाणी राहणारी माणसं, त्याठिकाणी फुलणारी नाती, आठवणी हे सगळं म्हणजे घर आहे.  एशियन पेंट्सने तयार केलेल्या मौनीच्या घराचा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहायलाच हवा.

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतीच ती रणबीर कपूर व आलिया भटच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने जुनूनची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं होतं.

टॅग्स :मौनी राॅयबॉलिवूडसेलिब्रिटी