‘देने वाला जब भी देता है छप्पर फाड कर देता है,’ अशी एक हिंदी म्हण आहे. तूर्तास तरी मौनी रायला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. गतवर्षी अक्षय कुमार स्टारर ‘गोल्ड’ या चित्रपटातून मौनीचा दणकेबाज बॉलिवूड डेब्यू झाला. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर बक्कळ कमाईच केली नाही तर प्रेक्षक व समीक्षकांनीही या चित्रपटातील मौनीच्या अभिनयाचे कौतुक केले. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच मौनीने अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ साईन केला होता. यापाठोपाठ जॉन अब्राहमचा ‘रोमियो अकबर वॉल्टर’ आणि राजकुमार रावचा ‘मेड इन चायना’ हे दोन चित्रपटही तिच्या झोळीत पडले. हे चार चित्रपट साईन केल्यानंतर आता मौनीने आपला पाचवा चित्रपटही साईन केला आहे.
मी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अपोझिट काम करतेय, यावर अद्यापही माझा विश्वास बसत नाहीय. त्यांच्यासोबत काम करून मला खूप काही शिकायला मिळेल, असेही ती म्हणाली.‘बोले चूडिया’ हा चित्रपट नवाजुद्दीनचा भाऊ शामस नवाब सिद्दीकी दिग्दर्शित करतोय. या चित्रपटाद्वारे शामस दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवतोय.