टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?, आता दिसते बोल्ड व ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 18:00 IST
ग्लॅमर जगतातील कलाकारांमध्ये नेहमी ग्लॅमरस दिसण्यासाठी चढाओढ लागलेली असते. त्यातील काही अभिनेत्रींच्या लूकमध्ये इतका बदल झाला आहे की त्यांचे जुने फोटो पाहिल्यानंतर त्यांना आता ओळखणं कठीण जातं आहे.
टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?, आता दिसते बोल्ड व ग्लॅमरस
ग्लॅमर जगतातील कलाकारांमध्ये नेहमी ग्लॅमरस दिसण्यासाठी चढाओढ लागलेली असते. त्यातील काही अभिनेत्रींच्या लूकमध्ये इतका बदल झाला आहे की त्यांचे जुने फोटो पाहिल्यानंतर त्यांना आता ओळखणं कठीण जातं आहे. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय.
छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मौनी लवकरच 'मेड इन चाइना' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत राजकुमार राव दिसणार आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
मौनी रॉयचे जुने फोटो पाहिल्यावर तिला ओळखणं कठीण जातं आहे. तिचे हे फोटो तिच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या दिवसातील आहेत.
मौनी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. तिने तिच्या करियरची सुरूवात २००६ साली एकता कपूरची मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून केली होती. त्यासोबतच ती रिएलिटी शो 'जरा नच के दिखा'ची देखील विजेती आहे.
मौनी रॉय त्यावेळी चर्चेत आली जेव्हा तिने 'देवो के देव- महादेव' मालिकेत सतीची भूमिका केली होती. सतीच्या नावानं ती घराघरात प्रचलित झाली. त्यानंतर अचानक ती सुंदर दिसू लागले की लोक तिला पाहून चकीत झाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मौनीने लिप आणि जॉची सर्जरी केली होती. पण तिने ही गोष्ट स्वीकारली नाही. तिचे आधीचे फोटो पाहून आपण अंदाज लावू शकतो. तिच्या लुकमधील बदलामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.
चित्रपटांबद्दल सांगायचं तर मौनीनं 'गोल्ड' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली. त्यानंतर ती 'केजीएफ' आणि 'रोमियो अकबर वॉल्टर'मध्ये दिसली.