Join us

साऊथ इंडस्ट्रीत शोककळा, निर्माते अन् ज्युनियर एनटीआरच्या खास मित्राचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 1:16 PM

चित्रपट निर्माते महेश कोनेरू यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्युनियर एनटीआरचे ते जवळचे दोस्त होते. त्यामुळे, एनटीआर यांनी ट्विटरवरुन आपल्या दु:खी भावना शेअर केल्या आहेत.

ठळक मुद्देमहेश यांच्या कुटुंबीयांस आणि निकटवर्तीयांच्या प्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो, असे ज्युनियर एनटीआरने म्हटलंय.  

हैदराबाद - दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश कोनेरू यांचं निधन झालं आहे. महेश कोनेरू यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महेश कोनेरू यांनी किर्थी सुरेश स्टारर फिल्म मिस इंडिया, सुभाकू नमस्कारम, थिमारुसू आणि पुलीस वारी हिचारिका यांसारखे सुपरहीट चित्रपट दिले आहेत. महेश कोनेरु हे फिल्मस्टार ज्युनियर एनटीआरचे अतिशय जवळचे निर्माते होते. 

चित्रपट निर्माते महेश कोनेरू यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्युनियर एनटीआरचे ते जवळचे दोस्त होते. त्यामुळे, एनटीआर यांनी ट्विटरवरुन आपल्या दु:खी भावना शेअर केल्या आहेत. अतिशय दु:खी अंतकरणाने मी आपणा सर्वांना हे कळवत आहे की, माझे प्रिय मित्र महेश कोनेरू हे आता आपल्यात राहिले नाहीत. मी पूर्णपणे स्तब्ध आणि निशब्द झालोय, महेश यांच्या कुटुंबीयांस आणि निकटवर्तीयांच्या प्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो, असे ज्युनियर एनटीआरने म्हटलंय.    

टॅग्स :बॉलिवूडसिनेमाहैदराबादएन.टी.आर. बायोपिक