Join us

मौसमी चॅटर्जीच्या मुलीचे निधन, गेल्या वर्षभरापासून होती कोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 15:23 IST

2017 पासून तिची तब्येत बिघडत होती.अनेकवेळा तिला उपाचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर गुरूवारी मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. मौसमी यांची कन्या पायल डिकी सिन्हाचे दिर्घआजाराने निधन झाले. 2017 पासून तिची तब्येत बिघडत होती.अनेकवेळा तिला उपाचारासाठी रूग्णालयात  दाखल करण्यात आले होते. अखेर गुरूवारी  मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली. 

 2010साली पायल बिझनेसमॅन डिकी सिन्हासह लग्नबंधनात अडकली होती. मात्र काही दिवसानंतर त्यांच्यात वाद व्हायला सुरूवात झाली. तेव्हापासून त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. तसेच गेल्या वर्षभरापासून  पायल ही कोमात होती. हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर पती डिकी पायलची योग्य ती काळजी घेत नसल्याचा आरोपही मौसमी यांनी जावयावर केला होता.  तसेच पायलची दिवसेंदिवस खालावत चाललेली तब्येतीमुळे डिकीने पायलवरचे सगळे उपचार बंदद केल्याचाही आरोप मौसमी यांनी डिकीवर केले होते.

तसेच पायल आणि डिकी यांच्या वाद वाढत होते. तेव्हाच मौसमी आणि पती जयंत यांनी डिकी विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. तसेच पायलची देखभाल करण्यासाठी पालकांना संमती देण्यात यावी अशीही त्यांनी न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. तुर्तास पायलच्या निधनाची बातमी कळताच निकटवर्तीयांनी  दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केलीय.