-रवींद्र मोरे मागचे वर्ष बॉलिवूडसाठी विशेष ठरले. २०१८ मध्ये हिचकी, स्त्री, बधाई हो, अंधाधुन आणि पद्मावत सारखे बऱ्याच सुपरहिट चित्रपटांनी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांनी मनोरंजन केले. आता हिंदी चित्रपटांच्या दर्शकांना यंदाच्या वर्षाकडूनही अशाच अपेक्षा आहेत. यावर्षीही बॉक्स ऑफिसवर बरेच धमाकेदार चित्रपट धडकणार आहेत. त्यातच बॉक्स ऑफिसवर दिग्गज स्टार्सच्या चित्रपटांचा क्लॅश होणे संभवच आहे. विशेष म्हणजे हा क्लॅश प्रेक्षकांना अविस्मरणीय ठरेल यात शंका नाही.
* मणिकर्णिका, ठाकरे आणि सुपर 30 वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तीन चित्रपट एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. २५ जानेवारी रोजी कंगणा राणावतचा ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’, नवाजुद्दीन सिद्धीचा ‘ठाकरे’ आणि ऋतिक रोशनचा‘सुपर 30’ रिलीज होणार आहे. याशिवाय कमाईच्या बाबतीतही या तिन्ही चित्रपटांमध्ये टक्कर बघावयास मिळणार आहे. या तिन्ही चित्रपटांव्यतिरिक्त इमरान होशमीचा ‘चीट इंडिया’ देखील रिलीज होणार होता, मात्र चीट इंडियाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
* भारत आणि लीजेंड ऑफ मौला जटयावर्षी बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खानचा ‘भारत’ देखील रिलीज होणार आहे. त्याचा हा चित्रपट फवाद खानच्या ‘लीजेंड ऑफ मौला जट’ सोबत रिलीज होणार असून फवाद खानचा हा चित्रपटही दीर्घकाळापासून चर्चेत आहे.
* बाटला हाउस, साहो आणि मिशन मंगलदरवर्षाप्रमाणे यावर्षीही १५ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर तीन चित्रपटांचा क्लॅश होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी जॉन अब्राहमचा ‘बाटला हाउस, प्रभासचा ‘साहो’ आणि अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ रिलीज होणार आहे.
* केसरी आणि टोटल धमालबॉलिवडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट ‘केसरी’ देखील अजय देवगनच्या ‘टोटल धमाल’ सोबत रिलीज होणार आहे. आता आगामी काळच ठरवेल की या दोन सुपरस्टार पैकी कोणाचा चित्रपट बॉक्स ऑफिस दणाणून सोडेल.
* ब्रह्मास्त्र आणि किक 2दबंग सलमान खानचा ‘किक 2’ देखील याच वर्षी रिलीज होणार आहे. हा चित्रपट रणबीर कपूर, अलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांचा ‘ब्रह्मास्त्र’ सोबत रिलीज होणार असून प्रेक्षकांचे झकास मनोरंजन होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘किक 2’ या चित्रपटांचा यावर्षी क्रिसमस निमित्त बॉक्स ऑफिसवर क्लॅश होणार आहे.