Join us  

​तिव्र विरोध होऊनही प्रदर्शित झाले हे चित्रपट !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 10:09 AM

-रवींद्र मोरे दीपिका पादुकोणचा चित्रपट ‘पद्मावती’ वरुन सुरु असलेला वाद थांबण्याचे नावच घेत नाही. लोक रस्त्यावर उतरुन या चित्रपटावर ...

-रवींद्र मोरे दीपिका पादुकोणचा चित्रपट ‘पद्मावती’ वरुन सुरु असलेला वाद थांबण्याचे नावच घेत नाही. लोक रस्त्यावर उतरुन या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. वाढलेला वाद पाहता या चित्रपटाचे प्रदर्शनच लांबणीवर गेले आहे. पद्मावतीच्या अगोदरही असेच काही चित्रपट आहेत ज्यांना प्रदर्शित न होण्यासाठी तिव्र विरोध करण्यात आला होता. मात्र एवढा विरोध होऊनही हे चित्रपट प्रदर्शित झाले. जाणून घेऊया या चित्रपटांबाबत...* बाजीराव मस्तानीया अगोदर ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटालाही विरोध झाला होता. विशेष म्हणजे हा चित्रपटदेखील संजय लीला भंसालीचाच होता. हा चित्रपट पेशवा बाजीराव आणि मस्तानीच्या प्रेमकथेवर आधारित होता. यात ऐतिहासिक आणि पात्रांची सत्यता यात फेरफार करण्यात आल्याच्या कारणावरु न विरोध करण्यात आला होता. या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोपडा मुख्य भूमिकेत दिसले होते.   * उड़ता पंजाबविरोधात उडता पंजाब हा चित्रपटदेखील समावेश आहे. यात नशायुक्त पदार्थ आणि त्यास प्रेरित करणारे एक राज्य याबाबतचे चित्रीकरण यात दाखविण्यात आले आहे, शिवाय यातील काही दृष्य तसेच संवादावरही आक्षेप घेण्यात आले होते. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेले होते. काही दृष्य कापल्यानंतर हा चित्रपट रिलीज झाला होता. यात शाहिद कपूर आणि आलिया भट यांनी काम केले होते.    * डर्टी पॉलिटिक्सया चित्रपटालाही रिलीजच्या अगोदर विरोध झाल होता. या चित्रपटाच्या फर्स्टलुकमध्ये मल्लिका शेरावत भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये लिपटलेली दिसत असून अशाने देशाचा अपमान होत आहे, यामुळे विरोध झाला होता. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचले होते. या चित्रपटात मल्लिकाबरोबरच ओम पुरी आणि आशुतोष राणा यांनीही काम केले होते.  * गोलियों की रासलीला राम-लीलासंजय लीला भंसालीचा चित्रपट ‘गोलियों की रासलीला राम-लीला’देखील रिलीजच्या अगोदर विवादात सापळला होता. या चित्रपटाच्या नावात रामलीला होते. श्रीरामाच्या नावाच्या विपरित या चित्रपटात वेगळेच काही दाखविण्यात आल्याने या चित्रपटाला विरोध झाला होता. शिवाय चित्रपटाच्या नावाच्या पुढे ‘गोलियो की रासलीला..’ असे आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी काम केले आहे.  * दिलवालेशाहरुख खानच्या ‘दिलवाले’ या चित्रपटालाही खूप विरोध झाला होता. कथा किंवा डॉयलॉगवरुन या चित्रपटाला विरोध झाला नव्हता, तर शाहरुख खानने वाढदिनाच्या दिवशी असहिष्णुतावर आपले मत व्यक्त केले होते, त्यामुळे त्याचवेळी रिलीज होणाऱ्या त्याच्या या चित्रपटाला विरोध झाला होता. यावेळी या चित्रपटाचे पोश्टरही जाळण्यात आले होते.