बॉलिवूडची ‘मुन्नी’ मलायका अरोरा ( Malaika Arora) सध्या तिच्या ‘मूव्हिंग इन विद मलायका’ या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये मलायकाने आत्तापर्यंत खासगी आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केलेत. बी-टॉऊनचे अनेक सेलिब्रिटी तिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसलेत. आता नव्या एपिसोडमध्ये मलायकासोबत करण जोहर आणि नोरा फतेही (Nora Fatehi) दिसणार आहेत. पण कदाचित मलायका व नोरा यांच्यात फार काही ‘ऑल वेल’ नाही. आता हे आम्ही नाही तर ‘मूव्हिंग इन विद मलायका’चा नवा प्रोमो म्हणतोय.‘मूव्हिंग इन विद मलायका’चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यात मलायका व नोरा यांच्यात बिनसल्याचं दिसतंय आणि यानंतर नोरा रागा रागात शो सोडून जाताना दिसतेय.
प्रोमोच्या फर्स्ट पार्टमध्ये मलायका करण जोहरसोबत गप्पा मारताना दिसते. करण नेहमीप्रमाणे मलायकाची मजा घेत प्रश्न विचारतो. जेव्हा तुझ्या बॉडी पार्टबद्दल बोललं जातं, तेव्हा तुला कसं वाटतं? तू लग्न कधी करणार? असं करण मलायकाला विचारतो. करणच्या या प्रश्नामुळे मलायका वैतागते आणि हा तुझा नाही माझा शो आहे आणि माझ्या शोमध्ये केवळ मीच प्रश्न विचारू शकते, असं मलायका त्याला म्हणते.
नोराला का आला राग?प्रोमोच्या सेकंड पार्टमध्ये मलायका कोरिओग्राफर टेरेन्स लुईस व अभिनेत्री नोरा फतेहीसोबत चर्चा करताना दिसते. यादरम्यान मलायका नोराबद्दल बोलते. नोरा कधी ‘गर्म’ तर कधी ‘नर्म’ स्वभावाची व्यक्ती आहे. मलायकाचा अर्थ हा की, नोराचा मूड नेहमी स्विंग होतो. याचदरम्यान टेरेन्स व मलायकाला एकत्र डान्स करण्याचा सल्ला देतो. पण अचानक कुठल्या का कारणाने नोराचा पारा चढतो आणि ती शो सोडून निघून जाते.
टेरेन्स नोराची समजून काढण्याचा प्रयत्न करतो. पण नोराचा पारा चढलेला असतो. नोरा शोमधून निघून जाते, पण मलायका तिला थांबवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी फुल्ल टशनमध्ये अॅटिट्यूड दाखवते. मलायका व नोरा बघून दोघींतही फार काही ऑल वेल नसल्याचं दिसतंय. आता हे खरं आहे की प्रँक आहे, हे तर एपिसोड बघितल्यानंतरच कळेल.