Join us

आंतरराष्ट्रीय सौंंदर्य स्पर्धेत स्पर्धकांमध्ये झाली हाणामारी, व्हिडिओ झाला व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 3:39 PM

आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत एका सुंदरीला विजेतेपद दिल्यानंतर चक्क हाणामारी झाली आणि तिचे विजयी मुकूट काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात ही सौंदर्यवती जख्मी देखील झाली.

ठळक मुद्देमिसेस श्रीलंका सौंदर्य स्पर्धेत ही घटना घडली, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या स्पर्धेत पुष्पिका डिसिल्वा या सौंदर्यवतीने विजेतेपद मिळवले.

सौंदर्याच्या अनेक स्पर्धा अनेक देशात तसेच जागतिक स्तरावर होत असतात. या स्पर्धांमध्ये एखादाच विजेता ठरतो. मात्र इतर स्पर्धक हसतमुखाने या विजेत्याला नेहमीच शुभेच्छा देताना दिसतात. पण एका आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत एका सुंदरीला विजेतेपद दिल्यानंतर चक्क हाणामारी झाली आणि तिचे विजयी मुकूट काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात ही सौंदर्यवती जख्मी देखील झाली.

मिसेस श्रीलंका सौंदर्य स्पर्धेत ही घटना घडली, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या स्पर्धेत पुष्पिका डिसिल्वा या सौंदर्यवतीने विजेतेपद मिळवले. तिला मिसेस श्रीलंका या पुरस्काराने गौरवण्यात आलं. मात्र परीक्षकांचा हा निर्णय गतविजेती कॅरोलिन जूरीला आवडला नाही. तिने थेट पुष्पिकाच्या डोक्यावरील मुकूट हिसकावून घेतला आणि उपविजेत्या सौंदर्यवतीला घातला. क्षणार्धात घडलेल्या या प्रकारामुळे सर्वच जण गोंधळले. स्टेजवर काय सुरू आहे हे कोणालाच कळत नव्हते आणि पुष्पिकाचा मुकूट हिसकावून घेतल्याने तिच्या डोक्याला जखम झाली. पुष्पिकाला वेदना होत असल्याने ती रडतच तिथन निघून गेली. हा सगळा गोंधळ तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कॅरोलिनच्या वागणुकीबाबत नेटिझन्स तिला सुनावत आहेत. 

कॅरोलिनवर जगभरातून टीका होत असल्याने तिने तिची बाजू मांडली आहे. पुष्पिका ही घटस्फोटीत असून तिला हा मुकूट देऊन परीक्षक चुकीच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देत असल्याचे तिचे म्हणणे आहे. तर यावर पुष्पिकाने देखील उत्तर दिले आहे. माझा घटस्फोट झालेला नसून केवळ मी पतीपासून वेगळी राहात आहे आणि मुलांचा सांभाळ करत आहे. माझ्यासारख्या अनेक महिला श्रीलंकेत आहेत. माझ्यासोबत या कार्यक्रमात जे घडले ते अतिशय वाईट होते, अशी तिने तिची बाजू मांडली आहे. 

 

ආයුබෝවන්! මා හිතවත්, ආදරණීය, ගෞරවණීය, බුද්ධිමත් ශ්‍රී ලාංකික සහ ලෝකවාසී ජනතාවනි, සිදුවූ අනපේක්ෂිත සිදුවීම සම්බන්ධයෙන්...

Posted by Pushpika De Silva on Monday, April 5, 2021
टॅग्स :श्रीलंका