Join us

तू मराठी आहेस का? मृणाल ठाकूरला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने थेट 'हे' गाणं गात दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 11:01 IST

मराठी आहेस का ? मृणाल ठाकूरने हटके अंदाजात दिलं उत्तर

Mrunal Thakur Answer To Fans Question  : मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हे नाव हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या च्या यादीत अव्वल स्थानावर येतं.  साऊथ तसेच हिंदी मनोरंजन विश्वात मृणालने आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे. मृणालचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या बद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात.  मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. विविध पोस्टद्वारे मृणाल चाहत्यांच्या तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, याबद्दल अपडेट देत असते. 

नुकतंच मृणालने सोशल मीडियावर  'आस्क मी सेशन' घेतलं. यावेळी तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याने तिला चाहत्याने तू मराठी आहेस का? असा प्रश्न विचारला. यावर मृणाल एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं. व्हिडीओमध्ये मृणालच्या तीन मैत्रिणी दिसताय. तर मृणालच्या हातात कॅमेरा असून तिचा आवाज ऐकायला येतोय. मृणाल तिच्या मैत्रिणींना म्हणते आपण महाराष्ट्रीयन आहोत ना. तर तिच्या मैत्रीणी म्हणतात, होय, आम्ही कट्टर महाराष्ट्रीयन आहोत. जय महाराष्ट्र. यावर  मृणाल म्हणते,  हे त्यांना कसं कळेल? एखादं मराठी गाणं गा. मग मृणालसह तिच्या मैत्रिणी या सांग सांग भोलानाथ हे गाणं गातात. 

मृणालचा हा व्हिडीओ सद्या चर्चेत आहे.  मृणाल ही मूळची धुळ्याची आहे. मृणालचं मराठी प्रेम कायम दिसून येतं.  मृणाल हिला उत्तम मराठी बोलताही येतं आणि खूप गोड ती गातेही. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर, मृणाल अलीकडेच विजय देवरकोंडासोबत 'द फॅमिली स्टार' चित्रपटात दिसली होती. अभिनेत्री लवकरच 'सन ऑफ सरदार २', 'विश्वंभरा' या सिनेमांमध्ये दिसणार आहे. तिचे अनेक चाहते मृणालने मराठीत काम करावे या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :मृणाल ठाकूरमराठीइन्स्टाग्राममहाराष्ट्र