Join us

मृणाल ठाकूरनं गाडी चालवणाऱ्या महिलांना दिला 'हा' मोलाचा सल्ला, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:34 IST

मृणाल हिने आता इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Mrunal Thakur: मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मृणाल ठाकूर अनेकदा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी संवाद साधते. मग ते तिच्या दैनंदिन अपडेट्स शेअर करणे असोत किंवा काही गोष्टी शेअर करणे असोत. इतकेच नाही तर आता तिनं महिलांना गाडी (Mrunal Thakur Shares A Safety Tip For Female Drivers) चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबद्दल सांगितलं आहे.

मृणाल हिने आता इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिनं महत्त्वाची सुरक्षा टीप्स शेअर केली आहे. अनेकदा महिला क्लचर वापरून केसांचा अंबाडा/जुडा बनवतात. मग गाडी चालवतानाही त्याच्या डोक्यावर कल्चर असतो. पण, गाडी चालवताना असा डोक्याच्या मागच्या बाजूला क्लचर असणे धोकादायक असते. या छोट्या ॲक्सेसरीजपासून मोठा धोका आहे. कार अपघात झाल्यास ते कल्चर डोक्यात घुसू शकतात. यासंदर्भात गाडी चालवताना काळजी कशी घ्यावी, असा व्हिडीओ तिनं शेअर केलाय. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "मुलींनो, कृपया गाडी चालवताना काळजी घ्या! जेव्हा तुम्ही गाडी चालवत आहात, तेव्हा असे क्लच डोक्यावर नाही, याची खात्री करा!". 

मृणालच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'सन ऑफ सरदार २', 'विश्वंभरा' या सिनेमांमध्ये दिसणार आहे. मृणाल ही मूळची धुळ्याची आहे. म्हणून तिला अहिराणी आणि मराठी दोन्ही उत्तम बोलताही येतं. मृणालचं मराठी प्रेम कायम दिसून येतं. अनेकदा ती मराठीतून बोलतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. एकेकाळी टीव्ही मालिकेत साइड रोल करणारी मृणाल ठाकूर आज कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे.मृणालने सुरुवातीला टीव्ही माध्यमात काम केलं होतं. २०१४ साली 'विटी दांडू' या मराठी सिनेमात ती झळकली होती. तसंच त्याच साली 'कुमकुम भाग्य' या गाजलेल्या मालिकेतही तिची भूमिका होती.

 

टॅग्स :मृणाल ठाकूरसेलिब्रिटीबॉलिवूडमहिला