महेन्द्र सिंग धोनी याचे जगभर असंख्य चाहते आहेत. आजही क्रिकेटप्रेमी आपल्या लाडक्या माहीवर जीवापाड प्रेम करतात. पण ही बातमी माहीबद्दल नाही तर त्याच्या ‘बहिणी’बद्दल आहे. होय, 2016 साली महेंद्रसिंग धोनीवर आलेला चित्रपट प्रचंड गाजला होता. आजही हा सिनेमा टीव्ही आला की, तो पाहण्याचा मोह आवरत नाही. या चित्रपटात अनेक कलाकार होते. यापैकीच एक होती स्वीनी खरा (Swini Khara).
होय, ‘एम.एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ (M.S. Dhoni: The Untold Story) या चित्रपटातील छोटा धोनी आठवत असेल तर त्याची छोटी बहिणही तुम्हाला आठवत असेल. स्वीनीने या चित्रपटात धोनीच्या बहिणीची बालपणीची भूमिका साकारली होती. आज ही धोनीची ‘बहिण’ चांगलीच मोठी झाली आहे. इतक्या वर्षानंतर तुम्ही ओळखूही शकणार नाही, इतकी ती बदललीये.
धोनीची बहिण जयंतीची मोठेपणीची भूमिका भूमिका चावलाने साकारली होती. तर छोट्या जयंतीची भूमिका स्वीनीने जिवंत केली होती. सध्या याच स्वीनीचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.या फोटोत स्वीनी कमालीची स्टायलिश दिसतेय. तिचे हे फोटो पाहून धोनीच्या चित्रपटात दिसलेली हीच ती छोटी जयंती यावर क्षणभर विश्वास बसत नाही.
स्वीनीने बालपणापासूनच अॅक्टिंगला सुरूवात केली होती. चीनी कम, परिणीता, दिल्ली सफारी, ऐलान, चिंगारी, कालो, पाठशाला अशा अनेक चित्रपटांत ती झळली आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरच्या बा बहू और बेटी, दिल मिल गए यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही तिने काम केलंय. पण तिला खरी ओळख मिळाली ती एम. एस. धोनीवरच्या बायोपिकमुळे. स्वीनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. मित्रांसोबतचे मौजमस्ती करतानाचे अनेक फोटो ती शेअर करत असते.
‘एम.एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकमध्ये सुशांत सिंग राजपूत याने धोनीची व्यक्तिरेखा साकारली होती. सुशांत सिंह राजपूत याने काम केलेला हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्याच्यासोबत अनुपम खेर, दिशा पाटणी, कियारा अडवाणी असे कलाकार देखील होते. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई देखील होती.