Join us

मनोज तिवारींना 'जीजाजी' म्हणतो एमएस धोनी, दोघांत नेमकं नातं काय? स्वतः खुलासा करत म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 4:47 PM

धोनी हा मनोज तिवारी यांना का म्हणतो 'जीजाजी'?

MS Dhoni Relation with Manoj Tiwari :  भाजप खासदार, भोजपुरी गायक आणि प्रसिद्ध अभिनेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) कायम चर्चेत असतात. राजकारणात सक्रीय झाल्यानंतरही मनोज तिवारी यांनी आपली गायनाची आवड जोपासली आहे. त्यांचं  'पंचायत' मधील 'हिंद के सितारा' हे गाणं चांगलंच गाजलं. मनोज तिवारींनी नुकतंच शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सिनेमा, राजकारण आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीशी (MS Dhoni) असलेल्या नात्यासंदर्भात खुलासा केला. 

शुभंकर मिश्राने आपल्या पॉडकास्टमध्ये त्यांना प्रश्न केला की तुम्ही एमएस धोनीचे भावोजी आहात असं म्हटलं जात, हे किती खरं आहे? यावर उत्तर देताना मनोज तिवारी म्हणाले, 'यात थोड सत्य नक्कीच आहे. धोनी आणि माझे मेहुणे अरुण पांडे हे चांगले मित्र होते.  एकेकाळी दिल्लीत आम्ही सर्व एकत्र राहत होतो. मी तेव्हासुपरस्टार सिंगर होतो. तेव्हा हे दोघे तिथे सराव करायचे. ते दोघेही मला 'जीजाजी'  (भावोजी) म्हणायचे.  मी त्याच्या मित्राचा भावोजी आहे आणि आपल्या भारतात मित्रही भावोजीच म्हणतात. त्यामुळे धोनीही मला भावोजी म्हणूनही हाक मारायचा. जोपर्यंत त्याच्यासोबत मेहुण्याच्या नात्यानं मजा-मस्ती करण्याचा विचार केला. तोपर्यंत तो खूप मोठा व्यक्ती झाला होता'.  

धोनीचे काम पाहणारी ऋति स्पोर्ट्स ही कंपनी मनोज तिवारी आणि राणी तिवारी यांची मुलगी ऋति तिवारी हिच्या नावावर होती. धोनी राणी तिवारीला बहिणीप्रमाणे मानतो. तो राणीच्या एका म्युझिक व्हिडिओमध्येही दिसला आहे. तो व्हिडीओही धोनीनेच लॉन्च केला होता. सध्या राणी तिवारीचा ऋति स्पोर्ट्सच्या संचालक मंडळात समावेश आहे. 

मनोज तिवारी यांची दोन लग्न झाली आहेत. त्यांचं पहिलं लग्न हे प्रतिमा पांडे यांच्याशी झालं होतं. मनोज यांच्यासोबत लग्न झाल्यावर प्रतिमा यांनी आपलं नाव बदलून  रानी केलं होतं.  पण, त्यांचं नात हे १३ वर्षे टिकले आणि नंतर २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. श्वेता तिवारीमुळे दोघांचा घटस्फोट झाल्याचं बोललं जातं. श्वेता तिवारी आणि मनोज तिवारींनी अनेक भोजपुरी चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते आहे. दोघेही 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या जवळीकतेच्या अनेक बातम्या येत होत्या. पण, दोघांनी या अफवा फेटाळून लावल्या होत्या. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आठ वर्षांनी २०२० मध्ये मनोज तिवारींनी सुरभीशी दुसरे लग्न केलं. 

 

टॅग्स :बॉलिवूडमहेंद्रसिंग धोनीसेलिब्रिटीलग्नराजकारण