Join us

मुग्धाने राहुल देवसोबत प्रेमात असल्याची दिली कबुली,पण तरीही 'लग्नाची काही घाई नाही',वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2018 11:19 AM

फॅशन जगताचं वास्तव मांडणा-या दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे मुग्धा गोडसे.पहिल्याच सिनेमातून तिने रसिक ...

फॅशन जगताचं वास्तव मांडणा-या दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे मुग्धा गोडसे.पहिल्याच सिनेमातून तिने रसिक आणि समीक्षकांवर अशी काही काही जादू केली की सा-यांच्या ओठावर एकच शब्द होते वाह मुग्धा तेरे क्या कहेने. फॅशन का जलवा म्हणणारी मुग्धा सध्या ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर असली तरी ती तिच्या खासगी आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.मुग्धा अभिनेता राहुल देवला गेल्या तीन वर्षापासून डेट करत आहे.या दोघांच्या घरच्यांनाही यांचे नाते मान्य असून ते कधी लग्न करणार याविषयी सध्या चर्चा सुरु आहेत.मुग्धाने नुकतेच राहुलसोबत प्रेमात असल्याची कबुली दिली असली तरीही सध्या लग्नाचा विचार केला नसून जेव्हा व्हायचे असेल तेव्हा लग्न होईल असे तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.राहुल आणि मुग्धा नेहमी एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.एकत्र व्हॅकेशन एन्जाॅय करतात. वेगवेगळ्या ठिकाणांवर क्लिक केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.मुग्धाच्या इन्सटाग्रामवर नजर टाकली असता तिचे अकाऊंटवर राहुलसोबतच्या फोटोंनी भरलेले आहे.गेल्या चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे कपल लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगत होती.नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात तिने लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले होते.मात्र आता मुग्धाने लग्न इतक्यात नाही तर वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी होतील असे सांगत लग्नाच्या विषयांवर सारवासारव करताना दिसली.मुग्धाचे लग्नाविषयीचे मत ऐकुण राहुल आणि मुग्धामध्ये सगळे सुरळीत सुरु आहे की नाही?अशाही चर्चा  रंगु लागल्या आहेत.त्यामुळे मुग्धा आणि राहुल देव दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकले नाहीतर चाहत्यांनाही म्हणावं लागेल कितने अजीब रिश्ते है यहाँ पे..............