Join us

14 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय मुग्धा गोडसे. पहिल्यांदाच रिलेशनशीपवर बोलली....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 2:33 PM

एका मुलाखतीदरम्यान मुग्धाने तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलली आहे.

अभिनेत्री मुग्धा गोडसे फिल्मी जगापासून सध्या दूर आहे. मुग्धाने 2002 मध्ये मेगा मॉडेल हंट जिंकून तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरूवात केली. यानंतर मुग्धाला बर्‍याच मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. 2004 साली मुग्धाने मिस इंडिया स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मुग्धाने 'चूप चप खडसे हो', 'लेकर हम दीवाना दिल' अशा अनेक हिंदी अल्बममध्ये काम केले आहे. मुग्धा तिच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत असते.  तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा असलेल्या राहुल देवला ती डेट करते आहे.

एका मुलाखतीदरम्यान मुग्धाने तिच्या नात्याबद्दल सांगितले की, 'एखाद्याला आपण कसे पाहू शकतो हे तुम्ही नाही ठरवू शकत. आपण फक्त प्रेमात पडतो आणि बाकीच्या इतर गोष्टी याच्यासोबत येतात.' याआधी राहुलने एका मुलाखतीत आपल्या नात्याबद्दल  म्हटले होते की, 'आमच्यात 14 वर्षांचा फरक आहे. मला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, पण मी या नात्याबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार केला आणि स्वतःला सांगितले की माझ्या आईवडिलांमध्येही 10 वर्षांचा फरक आहे. तसे पाहिले तर हे अंतर फार जास्त नाही आहे. असं असलं तरी, माझा विश्वास आहे की जोपर्यंत तुम्ही आनंदी आहात तोपर्यंत तुमच्यातील वयाच्या अंतराचा फरक पडत नाही.

याआधी राहुलचे लग्न रिनाशी झालं होतं. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. पण २००९ मध्ये रिनाचे कर्करोगाने निधन झाले. रिनाच्या निधनानंतर काहीच वर्षांनी मुग्धा त्याच्या आयुष्यात आली,  मुग्धाने २००८ मध्ये मधुर भंडारकरच्या ‘फॅशन’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. यांनतर तिने ऑल द बेस्ट, हेल्प, जेल, हिरोईन अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.  राहुलने चॅम्पियन, अशोका आणि एन्टॉप हिल या चित्रपटात काम केले आहे.

 

टॅग्स :राहुल देव