Join us

'फॅशन का जलवा' दाखवणारी ही अभिनेत्री पेट्रोल पंपावर करायची काम, दिवसाचे मिळायचे १०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 11:04 AM

तिने २००२ ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल हंट ही स्पर्धा जिंकली होती. मात्र मॉडेलिंग आणि यानंतर बॉलीवुडपर्यंत पोहचण्यासाठी तिला प्रचंड मेहनतही घ्यावी लागली. 

''फॅशन का है जलवा''.......... म्हणत तिने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. पहिल्याच सिनेमातून तिने रसिक आणि समीक्षकांवर अशी काही काही जादू केली की सा-यांच्या ओठावर एकच शब्द होते वाह तेरे क्या कहेने.. फॅशन जगताचं वास्तव मांडणा-या दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणा-या या अभिनेत्रीचं नाव म्हणजे मुग्धा गोडसे. 

 

पहिल्या सिनेमातील याच भूमिकेसाठी मुग्धाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्काराने गौरवण्यात आलं. मात्र एक अभिनेत्री बनण्यापर्यंतचा मुग्धाचा प्रवास सहज आणि सोपा नव्हता. २६ जुलै १९८६ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात मुग्धाचा जन्म झाला. पुण्यातील कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेची पदवी मिळवली.

अर्थशास्त्र या विषयाची तिला आवड असून त्याचा ती अभ्यास सातत्याने करत असते. तिने २००२ ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल हंट ही स्पर्धा जिंकली होती. मात्र मॉडेलिंग आणि यानंतर बॉलीवुडपर्यंत पोहचण्यासाठी तिला प्रचंड मेहनतही घ्यावी लागली. 

हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी तिने एका पेट्रोलपंपावरही काम केले आहे. यासाठी तिला दिवसाचे १०० रुपये मिळायचे. याबाबत फार कमी जणांना माहिती असून खुद्द मुग्धानेच एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला होता. त्यामुळे यशशिखरापर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येकालाच कठोर मेहनत घ्यावी लागते हे यावरुन पुन्हा समोर आले आहे.

'फॅशन' सिनेमाच्या यशानंतर मुग्धाने फॅशन दुनियेसह हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जेल, ऑल द बेस्ट, हिरोईन अशा विविध सिनेमातही मुग्धाने आपला अभिनय आणि सौंदर्याने रसिकांची मने जिंकली.