Join us

Anant-Radhika Pre Wedding: "प्यार हुआ इकरार हुआ...", बॉलिवूड गाण्यावर मुकेश-नीता अंबानी यांचा रोमँटिक डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 08:58 IST

लेकाच्या प्री वेडिंगमध्ये अंबानींची चर्चा, रोमँटिक डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी याच्या लग्नाची धामधुम सुरू आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या गुजरातमधील जमनागर येथे त्यांचं प्री वेडिंग फंक्शन सुरू आहे. अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या सोहळ्यातील काही व्हिडिओ समोर आले आहेत. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. त्यांच्या प्री वेडिंग सोहळ्यात हॉलिवूड पॉप स्टार रिहानाने तिच्या परफॉर्मन्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पण, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी या सोहळ्याचे खरे आकर्षण ठरले. लेकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसले. 'प्यार हुआ इकरार हुआ' या गाण्यावर मुकेश आणि नीता अंबानींनी रोमँटिक डान्स केला. त्यांचा सराव करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, १ ते ३ मार्च दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री वेडिंग फंक्शन जामनगर येथे होणार आहे. या सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरच फेसबुकचे मार्क झकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ते गुगलचे सुंदर पिचई असे बडे उद्योजक उपस्थिती लावणार आहेत. प्री वेडिंगनंतर जुलैमध्ये ते विवाहबंधानत अडकणार आहेत. 

टॅग्स :मुकेश अंबानीनीता अंबानी