Join us

दीपिका अन् रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 14:09 IST

रणवीर आणि दीपिका यांचं अंबानी कुटुंबीयांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 

Deepika Padukone-Ranveer Singh :  बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा झाले आहेत. मुंबईतील रुग्णालयात 8 सप्टेंबर रोजी दीपिकानं गोंडस मुलीला जन्म दिला आहे.  रणवीर-दीपिकाच्या लाडक्या लेकीला भेटण्यासाठी थेट उद्योगपती मुकेश अंबांनी गेले आहेत. अत्यंत कडक सुरक्षेत मुकेश अंबानी रुग्णालयात पोहोचले. 

मुकेश अंबांनी यांचा गाड्यांचा ताफा रुग्णालयात पाहायला मिळाला. एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या बाहेर ते त्याच्या कारमधून जाताना दिसले. विशेष म्हणजे, दीपिकानं ज्या रुग्णालयात मुलीला जन्म दिला, ते रुग्णालयसुद्धा मुकेश आणि नीता अंबानी यांचं आहे. दीपिकाची प्रसूती ही एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात झाली आहे.  रणवीर आणि दीपिका यांचं अंबानी कुटुंबीयांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी लग्नाच्या जवळपास सहा वर्षानंतर आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. या जोडप्यानं कन्यारत्न लाभल्याची बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर करताच अभिनंदनाचा पूर आला. आलिया भटपासून प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ, अर्जुन कपूर, परिणीती, सर्व स्टार्सनी शुभेच्छाचा वर्षाव केला. 

दीपिकाने सध्या फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला असून ती तिचा पूर्ण वेळ बाळासाठी देणार आहे. आपल्या बाळाची काळजी ती स्वतःच घेण्याचं ठरवलं आहे. नॅनीऐवजी दीपिका बाळाचा सांभाळ स्वत: करणार आहे. दीपिकानं बाळासाठी अनेक ऑफर नाकारल्या आहेत. 

दीपिका पादुकोण आणि रणवीर प्रसूतीच्या दोन दिवस आधी सिद्धीविनायक मंदिरात दर्शनाला गेले होते, त्यानंतर दीपिका  शनिवारी रुग्णालयात दाखल झाली आणि रविवारी कन्यारत्न लाभल्याची गोड बातमी कानावर आली. दीपिका आणि रणवीरच्या घरात लहान परी आल्याने चाहते खूप आनंदित झाले आहेत. आता ते बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

टॅग्स :मुकेश अंबानीदीपिका पादुकोणरणवीर सिंग