Join us

यापेक्षा दुसरा वाह्यात शो नाही...! मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’वर बरसले

By रूपाली मुधोळकर | Published: October 02, 2020 10:59 AM

 पुरूष महिलांचे कपडे घालून किळसवाणे विनोद करतात आणि लोक त्यावर हसतात...!!

ठळक मुद्देपाचव्या ट्वीटमध्ये त्यांनी एक उदाहरण दिले.

गत रविवारी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘महाभारत’ या मालिकेच्या अनेक निवडक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र महाभारतात भीष्म पितामहची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना हे अनुपस्थित होते. मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये का आले नाहीत? असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडला होता. अनेक सोशल मीडिया युजर्सनी थेट मुकेश खन्ना यांनाच हा सवाल केला. या प्रश्नाच्या उत्तरादाखल मुकेश खन्ना यांनी एकापाठोपाठ एक असे अनेक टिष्ट्वट केलेत. ‘द कपिल शर्मा शो’ एक वाह्याात शो आहे, असे ते या टिष्ट्वटमध्ये म्हणाले. मात्र काहीच वेळात त्यांनी हे ट्वीट डिलीटही केलेत.मुकेश खन्ना यांनी लागोपाठ सहा ट्वीट केलेत. यानंतर फेसबुकवरही एक पोस्ट लिहिली. मात्र नंतर त्यांनी या सगळ्या पोस्ट डिलीट केल्यात.

न बोलवण्याचा प्रश्नच नाही... ‘कपिल शर्मा शो’मध्ये भीष्म पितामह का दिसले नाहीत? हा प्रश्न व्हायरल झाला आहे. काहींनी म्हटले, त्यांना निमंत्रित केले गेले नव्हते, काहींच्या मते, त्यांनी स्वत: नकार दिला. मी सांगू इच्छितो की,  ‘कपिल शर्मा शो’मध्ये मला न बोलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मीच या शोमध्ये जाण्यास नकार दिला, असे ट्वीट त्यांनी केले.

मी आधीच नकार दिला होता...दुस-या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले,  ‘कपिल शर्मा शो’सारख्या इतक्या मोठ्या शोमध्ये जाण्यास तुम्ही नकार कसे देऊ शकता? असा प्रश्न मला लोक करतील. मोठमोठे कलाकार या शोमध्ये जातात. जात असतील, पण मुकेश खन्ना जाणार नाही. गुफीने मला आधीच विचारले होते. ते लोक आपल्याला निमंत्रण देणार आहे, यावर तुम्ही जा, मी अजिबात येणार नाही, हेच बोललो होतो.

वाह्यात शो...पुढच्या ट्वीटमध्ये त्यांनी  ‘कपिल शर्मा शो’मध्ये न जाण्यामागचे कारण सांगितले.  ‘कपिल शर्मा शो’ भलेही देशभर लोकप्रिय् असले. पण मी यापेक्षा दुसरा वाहयात शो पाहिला नाही. द्विअर्थी संवाद, पांचट विनोदांशिवाय यात काहीही नाही. पुरूष महिलांचे कपडे घालून किळसवाणे विनोद करतात आणि लोक त्यावर हसतात, असे त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिले.

एकाला तर फक्त हसण्याचे पैसे मिळतात...चौथ्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले, या शोमधे लोक जोरजोरात का हसतात, हे मला आजपर्यंत कळले नाही. एकाला तर शोमध्ये मध्यभागी सिंहासनावर बसवतात. हसणे हे त्याचे एकच काम.याचेही त्यांना पैसे मिळतात. आधी सिद्धू भाई हे काम करत. आता अर्चना बहन हे काम करते. काम? फक्त खो-खो हसणे.

विनोदाचा दर्जा इतका घसरला...पाचव्या ट्वीटमध्ये त्यांनी एक उदाहरण दिले. त्यांनी लिहिले, विनोदाचा दर्जा किती खालावला आहे, यासाठी एक उदाहरण देतो. तुम्ही सगळ्यांनी पाहिले असेलच की, यापूर्वी ‘रामायण’ची स्टारकास्ट याठिकाणी आली होती. कपिलने अरूण गोविल यांना प्रश्न विचारला होता. समजा तुम्ही बीचवर आंघोळ करत आहात आणि अचानक गर्दीतील एकजण जोरात ओरडतो की, अरे पाहा, रामजी सुद्धा व्हीआयपी अंडरविअर घालतात... यावर तुम्ही काय म्हणाल? अरूण गोविल या प्रश्नावर केवळ हसताना मी पाहिले होते. कारण मी फक्त प्रोमो बघितला होता. जग ज्यांनाकडे भगवान श्रीराम म्हणून पाहिते, त्यांना तुम्ही इतके अभद्र प्रश्न कसे विचारू शकता. मी त्यांच्या जागी असतो तर कपिलची बोलती बंद केली असती. म्हणूनच मी कपिल शर्मा शोमध्ये गेलो नाही.

 जया बच्चन यांच्यावर भडकले 'शक्तिमान' मुकेश खन्ना, म्हणाले - ओरडू नका, शांत बसा...

सोनाक्षी सिन्हानंतर एकता कपूरवर बरसले मुकेश खन्ना; म्हणे, एकताने महाभारताचा ‘मर्डर’ केला

टॅग्स :मुकेश खन्नाकपिल शर्मा