Join us

“मुलाकडे सेक्सची मागणी करणारी मुलगी...”,‘महिला’ व ‘सेक्स’वर बोलले मुकेश खन्ना, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 10:22 AM

Mukesh Khanna : होय, एका व्हिडीओत अभिनेते मुकेश खन्ना असं काही बोलले की लोकांचा पारा चढला.

‘छोटी छोटी मगर मोटी बातें’ सांगत लहान मुलांचा ‘शक्तिमान’ बनलेले अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna )अनेकदा काहीतरी बोलून वाद ओढवून घेतात. सध्या ते असंच काही बोलले आणि लोकांनी त्यांना जबरदस्त ट्रोल केलं. होय, एका व्हिडीओत ते असं काही बोलले की लोकांचा पारा चढला. आता मुकेश खन्ना असं काय बोलले ते जाणून घेऊ यात.

मुकेश खन्ना यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि ते नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलेत.

काय म्हणाले मुकेश खन्ना‘ एखादी मुलगी एखाद्या मुलाला स्वत:हून शरीरसंबंधांसाठी विचारत असेल तर ती मुलगी असभ्य आहे. ती मुलगी  मुलगी नाही तर ती धंदा करणारी आहे. कारण अशा निर्लज्जपणाच्या गोष्टी सभ्य समाजातील कोणतीही मुलगी करणार नाही आणि जर ती करत असेल ती असभ्य आहे, असं करणं हा तिचा व्यवसाय आहे. यात तुम्ही सहभागी होऊ नका,’ असं मुकेश खन्ना या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

हा व्हिडीओ समोर आला आणि लोकांनी मुकेश खन्ना यांना फैलावर घेतलं.  ‘किमान स्त्री शक्तीचा तरी मान ठेवायला हवा होता,’ अशा शब्दांत एका युजरने त्यांना सुनावलं. ‘माफ कर शक्तिमान पण यावेळी तू चुकलास,’ असं एका युजरने लिहिलं. ‘जेव्हा शक्ती आणि मान दोन्ही गोष्टी माणसाला सोडून जातात तेव्हा तो असं बोलू लागतो,’ अशी कमेंट एका युजरने केली. ‘शक्तिमान म्हातारपणात काहीही बरळतोय, आता तो सनकीमान झाला आहे,’ अशा शब्दांत एका युजरने आपला संताप व्यक्त केला. ‘ठीक आहे, आता आणखी एक व्हिडीओ बनव आणि सभ्य समाजातील मुलगा, यावर भाषण दे,’ अशी संतप्त कमेंट एका युजरने केली. 

टॅग्स :मुकेश खन्ना