Join us

MeToo वर मुकेश खन्ना यांचं वादग्रस्त विधान, 'महिलांचं बाहेर निघून काम करणं समस्येचं मूळ'

By अमित इंगोले | Published: October 31, 2020 11:49 AM

व्हिडीओत मुकेश खन्ना #MeToo वर आपले विचार मांडत आहे आणि महिला व पुरूषांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देत आहेत.

अभिनेते मुकेश खन्ना आणि वाद यांचं एक अतुट नातं तयार झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. द कपिल शर्मापासून सुरू झालेला वाद-विवादांचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. आता सोशल मीडियावर मुकेश खन्नाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत मुकेश खन्ना #MeToo वर आपले विचार मांडत आहे आणि महिला व पुरूषांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देत आहेत.

महिलांवर मुकेश खन्ना यांचं वादग्रस्त विधान

व्हायरल व्हिडीओत मुकेश खन्नाने महिलांनी घराबाहेर निघून काम करण्यावर आक्षेप जाहीर केला होता. त्यांचं असं मत आहे की, महिलांचं घराबाहेर पडणं हेच समस्येचं मूळ आहे. आता विवाद केवळ इथपर्यंत नाही. त्यांनी त्यांच्या वक्तव्यात मी टू मोहिमलाही जोडलं आहे. 

ते म्हणाले की, - ही मी टू ची समस्या सुरू तेव्हा झाली जेव्हा महिलांनी घराबाहेर निघून काम सुरू केलं. त्यांना आज पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची इच्छा आहे. पण यात सर्वात जास्त समस्या त्या मुलाची होते ज्याला आपल्या आईपासून दूर रहावं लागतं. त्याला आयासोबत रहावं लागतं आणि तिच्यासोबत बसून 'सांस भी कभी बहू थी' सारख्या मालिका बघतो.

मुकेश खन्ना ट्रोल

व्हिडीओमध्ये मुकेश खन्नाने स्पष्टपणे म्हणत आहे की, पुरूष पुरूष राहतो आणि महिला महिला असतात. सोशल मीडियावर मुकेश खन्नांच्या या व्हिडीओवर वादळ उठलं आहे. त्यांना वाईटप्रकारे ट्रोल केलं जात आहे. आपल्या या जुन्या व्हिडीओवर काय स्पष्टीकरण देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. 

पण सध्यातरी त्यांना लोकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. अनेक यूजर्स म्हणत आहे की, शक्तिमान तर मुळात किलविश निघाला. तर अनेक लोक मुकेश खन्नाच्या सर्व मालिका बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत. 

दरम्यान, याआधी मुकेश खन्नाने अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमावर वादग्रस्त विधान दिलं होतं. ते म्हणाले होते की, मेकर्सनी जर एखाद्या दुसऱ्या धर्माबाबत असं टायटल दिलं असतं तर तलवारी निघाल्या असत्या. त्यांनी अपील केली होती की, सिनेमाचं टायटल लगेट बदलावं. नंतर मेकर्सनी टायटल बदलून 'लक्ष्मी बॉम्ब'ऐवजी 'लक्ष्मी' असं ठेवलं आहे. 

टॅग्स :मुकेश खन्नासोशल व्हायरलटेलिव्हिजन