Join us

कोरोनामुळे बॉलिवूडला आणखी एक धक्का, जजमेंटल है क्या फेम अभिनेता ललित बहलचे झाले निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 11:50 AM

ललित हे अभिनेते असण्यासोबतच दिग्दर्शक, निर्माते होते. त्यांचा मुलगा देखील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे.

ठळक मुद्दे२३ एप्रिल रोजी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात ललित बहल यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

कोरोना व्हायरचा प्रार्दुभाव सगळीकडे वाढला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत अनेकजणांना प्राण गमवावे लागत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे निधन झाले आहे. आता कोरोनामुळे बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे.

२३ एप्रिल रोजी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात ललित बहल यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ललित यांनी तितली आणि मुक्ती भवन यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचा मुलगा दिग्दर्शक कानू बहल यांनी त्यांच्या निधनाविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘ललित यांना गेल्या आठवड्यात करोनाची लागण झाली होती. त्यांना हृदयाच्या समस्या होत्या. त्यात फुफ्फुसामध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत होता. त्यामुळे त्यांची स्थिती अतिशय गंभीर झाली होती. त्यानंतर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 71 वर्षांचे होते.’

ललित यांनी अफसाने या मालिकेद्वारे त्यांच्या करियरला सुरुवात केली होती. त्यांनी अभिनय करण्यासोबतच तपिश, आतिश यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. मेड इन हेवन या वेबसिरिजमध्ये तर जजमेंटल है क्या या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. 

टॅग्स :बॉलिवूड