Join us

मुंबईच्या अंडरवर्ल्डचे दर्शन घडविणारा 'मुम भाई' प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 7:42 PM

'मुम भाई' हा एक क्राइम ड्रामा असून तो मुंबईच्या अंडरवर्ल्डचे दर्शन घडवतो.

मुम भाई हा एक क्राइम ड्रामा असून तो मुंबईच्या अंडरवर्ल्डचे दर्शन घडवतो. १९८०च्या दशकाची अखेर ते २०००च्या दशकाची सुरुवात या काळातील मुंबईच्या उदरात घडणारी, पोलिस अधिकारी व गुन्हेगार यांच्यातील मैत्रीची कथा, या शोच्या केंद्रस्थानी आहे. ही वेबसीरिज नुकतीच ऑल्ट बालाजी आणि झी ५वर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

मुम भाईमध्ये अंगद बेदीसिकंदर खेर यांनी अफलातून जुगलबंदीही साधली आहे. या शोचा वेडेपिसे करणारा वेग प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या कथेत ओढून घेतो आणि शो सोडून उठण्याची कोणाची इच्छाच होत नाही. त्यात भर म्हणजे ‘मुम भाई’तील वास्तववाद केवळ सेटिंग आणि प्रमुख व्यक्तिरेखांच्या गेट-अपपुरता मर्यादित नाही, तर प्रत्येक कलावंतामध्ये मुरलेला आहे. या शोचा ‘सूत्रधार’ म्हणून शरद केळकरचा प्रभावी आवाज शोची उत्कटता वाढवतो आणि मुम भाईला एक मसालेदार चटक मिळवून देतो.

मुम भाईसारखा शो वेगळा ठरतो त्यातील अप्रतिम व्यक्तिरेखांमुळे. दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखांपुढे त्यांची उद्दिष्टे निश्चित आहेत, तर या शहरावर एकमेव भाई म्हणून राज्य करायच्या दोघांच्याही इच्छेने ते एकमेकांशी बांधलेले आहेत. संदीपा धरची वैष्णवी ही व्यक्तिरेखा पेशाने चार्टर्ड अकाउण्टंट आहे आणि ती स्त्रीवादाचा पुरस्कार करणारी आहे. मधुरिमा रॉयने उत्साहाने सळसळणारी रंजना रंगवली आहे, तर तृष्णा मुखर्जीची व्यक्तिरेखा मीरा जेवढी संयमी आहे, तेवढेच उग्र रूपही घेते.

मुंबई अंडरवर्ल्डच्या खिळवून ठेवणाऱ्या घडामोडींत मित्र एकमेकांचे शत्रू कसे होतात हे दाखवणाऱ्या कथेचा आनंद आरामात बसून लुटण्याची हीच वेळ आहे. 'शूटआउट अॅट लोखंडवाला' आणि 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' या चित्रपटांच्या निर्मात्यांनी तयार केलेली ही मालिका तुरुंग, सत्ता, पैसा, राजकारण, चकमकी, मुंबई व दुबई या अनेक विषयांना आजपर्यंत कधीच करण्यात आला नाही, अशा पद्धतीने स्पर्श करते आणि याबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा सर्वांच्या मनात निर्माण करते.

टॅग्स :शरद केळकरअंगद बेदीसिकंदर खेर