Aryan Khan arrest: झोप येईना, जेवण जाईना; आर्यनच्या अटकेनंतर अशी झालीय शाहरूख खानची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 05:32 PM2021-10-10T17:32:02+5:302021-10-10T17:33:29+5:30
Mumbai Cruise Drugs Case, Aryan Khan arrest: अद्याप आर्यनला जामीन मिळालेला नाही. पोराची ही अवस्था पाहून आई गौरी ढसाढसा रडताना दिसली होती. शाहरूखची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Case )अटकेत असलेल्या आर्यन खानच्या (Aryan Khan)अडचणी वाढल्या आहेत. एनसीबीनं क्रूझवर धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यात आर्यन खानचा समावेश होता. अनेक तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने आर्यनला अटक केली होती. तेव्हापासून आर्यनच्या सुटकेसाठी ‘खान’ कुटुंबाचे प्रयत्न सुरू आहेत. आर्यनचा जामीन अर्ज कोर्टानं दोनदा फेटाळला आणि त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला. वडील शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि आई गौरी खान आर्यनच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. पण अद्याप आर्यनला जामीन मिळालेला नाही. पोराची ही अवस्था पाहून आई गौरी ढसाढसा रडताना दिसली होती. अगदी कोर्टाच्या आवारात गाडीत ती रडताना दिसली होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. शाहरूखची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. त्याची तहानभूक, झोप सर्व उडाली आहे.
शाहरूखच्या एका जवळच्या मित्राचे मानाल तर, शाहरूखसाठी हा त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आहे. आर्यनच्या काळजीने शाहरूख ना झोपतोय, ना जेवतोय. वरवर तो आपण शांत असल्याचं भासवतोय. पण तो आतून पूर्णपणे कोलमडला आहे. स्वत:ला असहाय्य पिता समजू लागला आहे. तो फक्त काही तास झोप घ्यायचा. पण आता ती झोपही उडाली आहे. बॉलिवूड लाईफने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
आर्यनला जामीन मिळेल आणि तो घरी येईल, अशी शाहरूखला अपेक्षा होती. त्यामुळे सोमवारपासून कामावर परतण्याचा त्याचा विचार होता. पण अपेक्षेनुसार काहीही घडताना दिसलं नाही. आता शाहरूखने त्याच्या सर्व वर्क कमिटमेंट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचं समजतंय.
आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरूख त्याच्यासोबत फक्त 2 मिनिटं बोलला होता. एनसीबी कोठडीत असताना आर्यनला वडिलांशी बोलण्याची परवानगी दिली होती. पण फक्त 2 मिनिटांसाठी.
शनिवारी एनसीबीने शाहरुखच्या ड्रायव्हरची बराच वेळ चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना क्रूझ टर्मिनलवर सोडल्याचे ड्रायव्हरने कबूल केले आहे.
एनसीबीने शाहरुख खानच्या ड्रायव्हरला समन्स पाठवले होते. यानंतर त्याचीही ड्रग्स प्रकरणात सुमारे 12 तास चौकशी करण्यात आली. एनसीबीने आर्यन खान आणि त्याच्या मित्रांसंदर्भात ड्रायव्हरची चौकशी केली. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने कबूल केले आहे, की त्याने आर्यन आणि अरबाज यांना क्रूझ टर्मिनलवर सोडले.