मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर ड्रग्ज पार्टी सुरु असताना एनसीबीने (NCB) कारवाई केली आहे. एनसीबीने (NCB) टाकलेल्या या छाप्यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लेक आर्यन खानचादेखील (Aryan Khan) समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आर्यनला एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. सध्या आर्यनची कसून चौकशी सुरु असून सामान्यांपासून कलाविश्वापर्यंत सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावरदेखील आर्यनशी निगडीत अनेक गोष्टी नेटकऱ्यांकडून सर्च केल्या जात आहेत. यामध्येच आर्यनला सोडवण्यासाठी किंग खान कोणत्या वकिलाची मदत घेतोय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
ड्रग्स पार्टी सुरु असलेल्या क्रुझवरुन एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. आर्यनसोबतच दिल्लीतील काही नामांकित उद्योजकांच्या मुलीदेखील या पार्टीत असल्याचं समोर आलं आहे. सध्या एनसीबीने प्रत्येकाचे मोबाईल ताब्यात घेतले असून त्यांचे चॅट्स आणि टेक्स्ट मेसेज चेक केले जात आहेत.
आर्यन खानला ताब्यात घेणाऱ्या समीर वानखेडेंचं क्रांती रेडकरसोबत आहे खास कनेक्शन
ड्रग्स पार्टीमध्ये आर्यनचं नाव पुढे आल्यानंतर शाहरुख खानची एकच तारांबळ उडाली असून मुलाला सोडवण्यासाठी तो कसोशीने प्रयत्न करत आहे. यामध्येच तो अभिनेता संजय दत्तचे वकील यांची मदत घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mumbai Cruise Drugs Bust: आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया
शाहरुखने सध्या आर्यनच्या सुटकेसाठी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांच्याशी संपर्क साधला आहे. सतीश मानशिंदे यांची टीम सध्या एनसीबी कार्यालयात हजर आहे. मात्र, याप्रकरणी शाहरुखने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
आर्यनने दिली 'या' गोष्टीची कबुली
पार्टीमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून बोलावण्यात आल्याचं आर्यनने कबुल केलं आहे. तसंच या पार्टीत जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं मानधन देण्यात आलं नव्हतं. केवळ इतरांना पार्टीत सहभागी करण्यासाठी माझ्या नावाचा वापर करायचा होता असंही त्याने सांगितलं आहे.