Join us

Salman Khan House Firing: लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोई 'वाँटेड' घोषित, मुंबई पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 12:13 PM

Salman Khan House Firing: लॉरेन्स बिश्नोईची माणसं मुंबईत येताएत, काहीतरी मोठं करणार; मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल

सलमान खानच्या (Salman Khan) घरावरील गोळीबार प्रकरण दिवसेंदिवस नवनवीन वळण घेत आहे. काल शनिवारी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) अज्ञात कॉलवरुन धमकी मिळाली. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची माणसं मुंबईत येत आहेत आणि काहीतरी मोठं करणार आहेत असं म्हणत कॉल ठेवण्यात आला. यानंतर मुंबई पोलिस सावध झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी आज लॉरेन्स बिश्नोई आणि हल्ल्याची जबाबदारी घेणारा त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईला (Anmol Bishnoi) 'वाँटेड' घोषित करण्यात आलं आहे.पीटीआय रिपोर्टनुसार, मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई दोघांना 'वाँटेड' म्हणून घोषित केले आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या अन्य प्रकरणात गुजरातच्या साबरमती केंद्रीय तुरुंगात आहे. तर त्याचा भाऊ अनमोल कॅनडामध्ये आहे. मुंबई पोलिस लवकरच लॉरेन्सच्या कस्टडीची मागणी करु शकते. त्याच्यावर कलम 506(2) आणि 201 लावण्यात आले आहे.

16 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन आरोपींना अटक केली. अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरुनच सलमान खानच्या घरावर गोळीबार केला अशी कबुली दोघांनीही दिली. यानंतर हरियाणातूनही एकाला अटक झाली. सध्या पोलिस कसोशीने या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

दुसरीकडे सलमान खान काल पहिल्यांदा मुंबईबाहेर गेला. बीईंग स्ट्राँग च्या लाँचसाठी तो दुबईला गेला. त्याच्याभोवती सध्या तगडी सुरक्षा आहे. y+ सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 

टॅग्स :सलमान खानमुंबई पोलीसगुन्हेगारीमुंबईबॉलिवूड