Join us

हुक्का बार प्रकरणातून सुटल्यानंतर मुनव्वर फारुकीची पहिली पोस्ट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 2:49 PM

मुनव्वर बिग बॉसनंतर आता स्प्लीट्सव्हिला शोमध्ये सहभागी होणार आहे.

'बिग बॉस 17' चा विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी थोडक्यात वाचला आहे.  स्टँडअप कॉमेडियनला नुकतेच मुंबईपोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. हुक्का बारवर छापा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी मुनव्वरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. तसेच आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र, चौकशीनंतर मुनव्वरला सोडून देण्यात आलं आहे. या प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर मुनव्वरने आपली पहिली पोस्ट शेअर केली आहे.

मुनव्वर फारुकीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो मुंबई विमानतळावरचा आहे. यात मुनव्वर खूपच थकलेला दिसून येत आहे. फोटो शेअर करत मुनव्वरनं लिहलं, थकलोय आणि प्रवास करतोय'. यावेळी तो काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसला.  पोलिसांनी सांगितलं की, हा जामीनपात्र गुन्हा असला तरी पोलिसांनी नोटीस दिली आहे, त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबलान हुक्का बारच्या हुक्क्यांमध्ये बंदी असलेल्या तंबाखूचा वापर केला जात होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी बारवर छापा टाकला.  तेथे आढळलेल्या वस्तूंची तपासणी केल्यानंतर गुन्हा दाखल करून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले. या लोकांमध्ये फारुकीचाही समावेश होता.  मुनव्वर अशा एखाद्या प्रकरणाचा बळी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2021 मध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. जवळपास 1 महिना मुनव्वर तुरुंगात होता.

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनमुंबईपोलिसबिग बॉस