Join us  

'मुंज्या'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! १७ दिवसांत पार केला ८० कोटींचा गल्ला, जाणून घ्या एकूण कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 1:45 PM

Munja Box Office Collection : ७ जूनला प्रदर्शित झालेला 'मुंज्या' सिनेमा बॉक्स ऑफिसवर भारी पडत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

'मुंज्या' हा हॉरर कॉमेडी हिंदी सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. अखेर शुक्रवारी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. हटके स्टोरी आणि उत्तम क्लायमॅक्स असलेल्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ७ जूनला प्रदर्शित झालेला 'मुंज्या' सिनेमा बॉक्स ऑफिसवर भारी पडत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

पहिल्या दिवसापासूनच 'मुंज्या' सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर राज्य पाहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच या सिनेमाने ४ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर पहिल्या वीकेंडला १५.२५ कोटींचा बिझनेस केला. 'मुंज्या' सिनेमाने पहिल्या आठवड्यातच ३५.३० कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने ३२.६५ कोटींचा गल्ला जमवला. आता सिनेमाचं तिसऱ्या वीकेंडचं कलेक्शन समोर आलं आहे. 'मुंज्या' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने तिसऱ्या विकेंडला १२.३५ कोटींचा गल्ला जमवला. 

सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'मुंज्या' सिनेमाने १७ दिवसांतच ८० कोटींचा टप्पा पार केला आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत तब्बल ८३.६१ कोटींची कमाई केली आहे. आता 'मुंज्या' सिनेमाची १०० कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मराठी दिग्दर्शकाच्या हिंदी सिनेमाचं बॉक्स ऑफिसवरील यश पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. 

दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने 'मुंज्या' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये, अजय पूरकर हे मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.'स्त्री' या सिनेमाचे मेकर्स मॅडॉक फिल्म्सकडून 'मुंज्या' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

टॅग्स :सिनेमाबॉलिवूडसेलिब्रिटी