सलमान खान(Salman Khan)च्या 'बजरंगी भाईजान' (Bajrangi Bhaijaan Movie) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात सलमानसोबत करीना कपूर (Kareena Kapoor) मुख्य भूमिकेत दिसली होती. या सिनेमात हर्षाली मल्होत्रा(Harshali Malhotra)ने मुन्नीची भूमिका साकारली होती. हर्षाली मुन्नी बनून सर्वत्र लोकप्रिय झाली. या चित्रपटात ती इतकी निरागस दिसली की सगळे तिचे चाहते झाले. आता ही मुन्नी मोठी झाली आहे. हर्षाली सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती तिचे फोटोशूटसोबत डान्सचे व्हिडिओही शेअर करत असतो. आता हर्षालीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातील तिच्या लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
हर्षाली मल्होत्रा हिने नवीन वर्षाच्या निमित्ताने तिचा नवा लूक आणि स्टाइल शेअर केली. हर्षालीचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला, तर काहींना जुनी छोटी मुन्नी आठवली. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की हर्षाली शॉर्ट स्कर्ट, हाय नेक स्वेटर आणि सुंदर हेअर स्टाइलमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. हर्षाली मोठी झाली असेल पण तिच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा अजूनही कायम आहे. बजरंगी भाईजानमधील छोटी मुन्नीची झलक अजूनही तिच्या चेहऱ्यावर दिसते.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाएकाने लिहिले, निखळ सौंदर्य. देवाने पाठवलेली एंजेल आहे. एका व्यक्तीने कमेंटमध्ये कविताही लिहिली, तुझ्या सौंदर्याला उत्तर नाही, शब्दात व्यक्त करणं सोपं नाही. तुझ्या सौंदर्याची स्तुती करण्याचे धाडस माझ्यात दिसत नाही, तू असा गुलाब आहेस जो प्रत्येक बागेत फुलत नाही. एकाने लिहिले, अरे तू खूप गोंडस आहेस.
वर्कफ्रंटहर्षाली अकरावीत आहे आणि यावर्षी बारावीला जाणार आहे. २०२४ मध्ये तिचे १०वीचे मार्क्स चर्चेत होते. ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना तिने सर्वांना सांगितले होते की, तिला १०वीत ८३% गुण मिळाले आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, २०१५ मध्ये बजरंगी भाईजाननंतर, हर्षाली टीव्ही शो कुबूल है आणि लौट आओ तृषामध्ये दिसली होती. याशिवाय ती क्राइम पेट्रोलचा भागही आहे.