Join us

ऑस्कर विजेत्या संगीतकाराचं रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य; म्हणाला, "तोंडाला तीन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:37 IST

'छावा' म्युझिक लाँच वेळी ए.आर. रहमान यांच्या वक्तव्याची चर्चा

समय रैनाचा कॉमेडी शो 'इंडियाज गॉट लेटेंट' वादात आहे. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने शोमध्ये येत केलेल्या जोकमुळे तो वादात सापडला आहे. यानंतर समय आणि रणवीरवर तक्रारही दाखल झाली. त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली. दुसरीकडे आता समयने शोचे सर्वच एपिसोड डिलिट केलेत. दरम्यान या प्रकारावर नुकतंच संगीतकार ए आर रहमाननेही (A. R. Rahman) अप्रत्यक्षरित्या टिप्पणी केली आहे.

कालच 'छावा' सिनेमाचा म्युझिक लाँच  सोहळा पार पडला. संगीतकार ए आर रहमानने सिनेमात संगीत दिलं आहे. अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी  स्टेजवर विकी कौशलने ए आर रहमानला प्रश्न विचारला. 'कोणत्या तीन इमोजीमधून तू तुझ्या संगीताचं वर्णन करशील?' यावर ए आर रहमानने तोंडावर पट्टी लावल्याची कृती केली. मग सगळेच हसले. नंतर तो म्हणाला, 'तोंड उघडलं की काय होतं हे गेल्या एका आठवड्यात आपण सर्वांनीच पाहिलं'. ए आर रहमानच्या या उत्तरावर एकच हशा पिकला. विकीने सुद्धा रहमानकडून या उत्तराची अपेक्षा केली नव्हती. त्यामुळेही त्यालाही वेगळंच हसू आलं.

https://youtube.com/shorts/WBxBn9KuZ5s?si=1INhW0KUDGoOko-i

ए आर रहमानने सोशल मीडियावर एक स्टोरीही शेअर केली आहे. यामध्ये लिहिलं आहे की, "आपल्या तोंडाला तीन गेटकीपर लावावे. बोलण्याच्या आधी 'हे खरं आहे का? चांगलं आहे का? गरजेचं आहे का?" 

ए आर रहमानने नकळतपणे समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य केलं. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.'ऑस्कर विजेता इन्फ्लुएन्सर्सवर बोलतोय. कुठे चाललीये ही इंडस्ट्री'.दुसरीकडे आपल्या वक्तव्यावर रणवीर अलाहाबादियाने माफी मागितली आहे. तर समय रैनाने कालच स्टोरी शेअर करत लेटेंट शोचे सर्व एपिसोड डिलीट करत असल्याचं स्पष्ट केलं. 

टॅग्स :ए. आर. रहमानविकी कौशलसोशल मीडियारणवीर अलाहाबादिया