आशिकी, साजन यांचे संगीतकार नदिम श्रवणमधील श्रवण यांना कोरोनाची लागण, तब्येत खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 02:43 PM2021-04-19T14:43:10+5:302021-04-19T14:47:52+5:30

श्रवण यांना मुंबईतील एस.एल.रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Music composer Shravan Rathod on ventilator support after hospitalised for COVID-19 | आशिकी, साजन यांचे संगीतकार नदिम श्रवणमधील श्रवण यांना कोरोनाची लागण, तब्येत खालावली

आशिकी, साजन यांचे संगीतकार नदिम श्रवणमधील श्रवण यांना कोरोनाची लागण, तब्येत खालावली

googlenewsNext
ठळक मुद्देनदिम सैफी आणि श्रवण राठोड यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

संगीतकार नदिम श्रवण यांनी एकाहून एक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. या जोडीने नव्वदीचा काळ गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. याच जोडीतील श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. 

श्रवण यांना मुंबईतील एस.एल.रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची तब्येत स्थिर असली तरी चिंताजनक आहे.

नदिम सैफी आणि श्रवण राठोड यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आशिकी या चित्रपटातील गीतांमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नदिम यांचे नाव आल्यानंतर ही जोडी तुटली. नदिम आता बॉलिवूडपासून दूर आहेत.

नदिम श्रवण यांच्या जोडीने दिल है के मानता नही, साजन, सडक, साथी, दिवाना, फुल और काटे, राजा हिंदुस्तानी, जान तेरे नाम, धडकन, राजा, परदेस, दिलवाले यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले असून त्यांची सगळीच गाणी आजही हिट आहेत. 

Read in English

Web Title: Music composer Shravan Rathod on ventilator support after hospitalised for COVID-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.