Join us

MUST WATCH: ​‘बाहुबली2’च्या भव्यदिव्य सेटची ही पाहा एक झलक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2017 11:25 AM

‘बाहुबली2’ यंदाच्या सर्वाधिक बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असतानाच, या चित्रपटाबद्दलची लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अलीकडे चित्रपटाचे दुसरे पोस्टर लॉन्च केले गेले. आता या चित्रपटाच्या सेटवरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ ‘बाहुबली2’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली सेटची माहिती देत आहे.

‘बाहुबली2’ यंदाच्या सर्वाधिक बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असतानाच, या चित्रपटाबद्दलची लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अलीकडे चित्रपटाचे दुसरे पोस्टर लॉन्च केले गेले. आता या चित्रपटाच्या सेटवरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ ‘बाहुबली2’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली सेटची माहिती देत आहे. ‘बाहुबली2’मध्ये जो भव्य दिव्य सेट दिसणार आहे, त्याची एक झलक या व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कटप्पाने बाहुबली मारले, तो क्षणही तुम्हाला आठवणार आहे.या चित्रपटात प्रभासही दिसतो आहे. चार वर्षे मी ‘बाहुबली’च्या भूमिकेत अगदी गढून गेला होता. आता मी या भूमिकेपासून काहीसा ब्रेक घेऊ इच्छितो. मधल्या काळात मी सहा महिन्यांचा ब्रेक घेतला. या काळात एक शॉर्ट फिल्मही केली. मात्र राजमौली यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण आहे. या विलक्षण अनुभवामुळेच गेली चार वर्षे त्यांच्यासाठी मी स्वत:ला बांधून घेतले,असे प्रभास यात सांगताना दिसतोय.२०१५ मध्ये आलेल्या ‘बाहुबली’ने धुमाकूळ घालत बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक  १०० कोटीहून अधिकची कमाई केली होती.  ‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा  प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच या चित्रपटाद्वारे अपार लोकप्रीयता मिळवली. आता प्रभाव व राणाला ‘बाहुबली2’मध्ये पाहण्यास लोक उत्सूक आहेत. याशिवाय  कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा? या प्रश्नाचे उत्तरही प्रेक्षकांना जाणून घ्यायचे आहे. ‘बाहुबली2’मध्ये मध्यतरानंतर अर्थात क्लायमॅक्समध्ये या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.  या क्लायमॅक्स सीनवर तब्बल 30 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. . ‘बाहुबली2’च्या चित्रीकरणाला गतवर्षी डिसेंबरमध्ये सुरुवात झाली. त्यानंतर प्रभासने चार महिने इथेच विशेष प्रशिक्षण घेतले. प्रत्येक दृश्यायासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. त्याची ही मेहनत किती फळास आली, ते लवकरच दिसणार आहे.