आजवर स्त्रीयांवर होणा-या शारीरीक आणि मानसिक समस्यांना वाचा फोडणारे अनेक सिनेमे येऊन गेलेत. परंतु ‘भंवर’ या सिनेमात स्त्रीया मानसिक तसेच शारीरिक समस्यांना कश्या सामोरे जातात. त्यांच्यावर कोणती परिस्थिती उद्भवते. या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी हे एक उत्तम कथानक आहे. तसेच या सिनेमात बॉलिवूड अभिनेता गणेश यादव आणि कमलेश सावंत विशेष भूमिकेत झळकणार आहेत. रॉयल समृद्धी असोसिएट प्रेझेंट ‘भंवर’ या हिंदी सिनेमाचा टिझर नुकताच सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला. काही मिनीटातच हा टीझर १ लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.
बॅलन्स, पॉस्को 307, रंभ अशा सिनेमांचे दिग्दर्शन स्वरूप सावंत याने केले आहे. भंवर या सिनेमात त्याने लेखन, दिग्दर्शनासह, अभिनेता म्हणून देखिल काम केले आहे. या सिनेमाच्या कथानकाबद्दल स्वरूप सांगतो, “भंवर या सिनेमाचे लेखन माझ्यासह केशव कल्याणकर आणि साकेत लाड सावनगीकर यांनी केले आहे. स्त्रीयांवर होणारे अत्याचार, त्यांच्यावर लहानपणापासून केलेले जाच यावर भाष्य करणारे हे कथानक आहे. या सिनेमात बॉलिवूडचा स्टार गणेश यादवसह, कमलेश सावंत, श्रेया पासलकर, तन्मयी सावर्डेकर या दिसणार आहेत.
बॉलिवूड अभिनेता गणेश यादव भंवर सिनेमातील भूमिकेविषयी सांगतो, या सिनेमात मी अंडर कव्हर एजंटच्या भूमिकेत तुम्हाला भेटायला येणार आहे. खूपच रोमांचक आणि रहस्यमय असा हा सिनेमा आहे. माझी खात्री आहे, की लोकांना हा सिनेमा नक्की आवडेल. या सिनेमाची खासियत म्हणजे या सिनेमाचा दुसरा भागही लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित करण्यासाठी आम्ही सगळेच फार आतुर आहोत.”
अभिनेता कमलेश सावंत भंवर सिनेमाच्या अनुभवाविषयी सांगतात, “भंवर सिनेमात मी इन्सपेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. कथानकात लिहील्याप्रमाणे ज्या काही दुर्घटना घडतात. त्यांचा तपास मी वेगवेगळ्या पद्धतीने कसा करतो. आणि माझ्या आयुष्यात त्याचे पडसाद कसे उमटतात. हे तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच हा सिनेमा नोव्हेंबर २०२१ ला प्रदर्थित होणार आहे. तसेच या सिनेमाच्या सिक्वेलचंही शुटींग आम्ही लवकरात लवकर सुरू करणार आहोत.