Join us

ना आलिया भट्ट ना प्रियांका चोप्रा लता मंगेशकर यांना आवडतो या अभिनेत्रीचा आवाज !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2017 10:32 AM

बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींना सध्या गाणे गाण्याचे वेध लागले आहेत. अनेक अभिनेत्रींना अभिनयानंतर गायन क्षेत्रात ही आपला हात आजमावला आहे. ...

बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींना सध्या गाणे गाण्याचे वेध लागले आहेत. अनेक अभिनेत्रींना अभिनयानंतर गायन क्षेत्रात ही आपला हात आजमावला आहे. अशात भारताची गानकोकीळा लता मंगेशकर यांनी अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आवाजा बाबत एक वक्तव्य केले आहे. त्याचे झाले असे की श्रद्धा कपूर आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह लता मंगेशकर यांच्या घरी गेली होती.   लता मंगेशकर यांनी या गेट टू गेदरबाबत बोलताना सांगितले, काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूरचे संपूर्ण कुटुंबा आमच्याकडे आले होते. श्रद्धा, तिचा भाऊ सिद्धांत, मावशी पद्मिनी कोल्हापुरी आणि तेजस्विनी आले होते. मी श्रद्धाला तिच्या बालपणापासून ओळखते. मला कौतुक वाटते स्टार झाल्यानंतर ही ती अजून तशीच आहे. यानंतर पुढे बोलताना त्यांनी श्रद्धाला जी कॉम्पलिमेंट दिली आहे त्यापेक्षा चांगली कॉम्पलिमेंट तिला आतापर्यंत कोणी दिली नसेल. त्या म्हणाल्या, ''श्रद्धा खूप चांगली गाते आणि ती फक्त चांगली गातच नाही तर ती सूरात गाते.'' लता मंगेशकर यांच्याकडून गाण्याचे किंवा आवाजाचे कौतुक व्हावे यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असूच शकत नाही एखाद्या व्यक्तीसाठी.ALSO READ :  ​प्रभास व श्रद्धा कपूरमध्ये झालाय एक करार! जाणून घ्या काय?श्रद्धा कपूरने 'हॉफ गर्लफ्रेंड' या अर्जुन कपूरसोबतच्या चित्रपट 'मैं फिर भी तुमको चाहूंगी' हे गाणे गायले होते. श्रद्धाचे हे गाणं चांगलेच हिटसुद्धा झाले होते. श्रद्धाच्याशिवाय आलिया भट्ट, परिणीती चोप्रा आणि प्रियांका चोप्राने सुद्धा गायनक्षेत्रात आपले नशिब आजमावले आहे.  श्रद्धा कपूर प्रभाससोबत साहोमध्ये झळकणार आहे. हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. याचित्रपटासाठी श्रद्धाने एक चांगली रक्कम मानधन म्हणून मागितली असल्याची चर्चा होती.