दाक्षिणात्य सुपरस्टार चैतन्यचा आज 33 वा वाढदिवस असून त्याने खूपच कमी काळात त्याने त्याची एक जागा निर्माण केली आहे. 23 नोव्हेंबर 1986 ला हैद्राबाद येथे चैतन्यचा जन्म झाला. चैतन्यचे लग्न समांथा रूथसोबत झाले असून समांथा देखील अभिनेत्री आहे. समांथा आणि चैतन्य यांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने लग्न केले होते.
समांथा आणि चैतन्य यांच्या लग्नाआधी त्याचे एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत अफेअर होते. ही अभिनेत्री एका दाक्षिणात्य सुपरस्टारची मुलगी असून तिने देखील अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चैतन्य आणि कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन यांच्या अफेअरची चर्चा एकेकाळी मीडियात रंगली होती. त्या दोघांची ओळख 2013 मध्ये एका कॉमन फ्रेंडने करून दिली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या दोघांना सतत एकत्र पाहिले जात असे. ते दोघे लवकरच लग्न करणार अशा बातम्यादेखील सतत मीडियामध्ये येत होत्या. 2013 ला झालेल्या फिल्मफेअर पुरस्काराच्यावेळी तर त्या दोघांच्या जवळकीची चांगली चर्चा रंगली होती.
श्रुती आणि चैतन्य लग्न करणार असे वाटत असतानाच त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. त्याचदरम्यान समांथा चैतन्याच्या आयुष्यात आली. समांथाचे देखील सिद्धार्थसोबत ब्रेकअप झाले होते. त्यांनी सप्टेंबर 2016 मध्ये त्यांच्या नात्याची कबुली दिली आणि जानेवारी 2017 मध्ये साखरपुडा केला.