तेलगु सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु ( Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांच्या घटस्फोटाची सध्या जोरदार चर्चा आहे. 11 वर्षांचं रिलेशनशिप आणि 4 वर्षांचा संसार मोडत सामंथा व नागा यांनी नुकतीच घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटाबद्दल गोष्ट का गेली, हे अद्याप कळायला मार्ग नाही. पण आता एक वेगळीच बातमी कानावर येतेय. सामंथापासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्य म्हणे सैरभैर झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून तो हॉटेलात शिफ्ट झाला आहे.‘पिंकविला’च्या वृत्तानुसार, सामंथा अजूनही हैदराबादेतील तिच्या घरी राहतेय. पण नागा चैतन्यने शहरातील एका पॉश हॉटेलात मुक्काम हलवलायं. गेल्या महिनाभरापासून तो याच हॉटेलात मुक्कामाला आहे. चर्चा खरी मानाल तर, सामंथा केवळ नागाच्या ‘लव्हस्टोरी’ या सिनेमाच्या रिलीजची प्रतीक्षा करत होती. हा सिनेमा रिलीज होताच दोघांनीही सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली.
काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2017 साली सामंथा व नागा चैतन्य यांचं लग्न झालं होतं. गोव्यात थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं. जेवढी लग्नाची चर्चा झाली, तेवढीच त्यांच्या हनीमूनचीही चर्चा झाली होती. दोघेही तब्बल 40 दिवस हनीमूनला गेले होते. 40 दिवस जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत त्यांनी हनीमून एन्जॉय केलं होतं. चार वर्ष दोघांचाही सुखात संसार सुरू होता. पण गेल्या वर्षभरात दोघांमधील मतभेद वाढले होते. याचीच परिणीती अखेर घटस्फोटात झाली.
लग्नानंतर सामंथाने तिचं सिनेमा करिअर सुरु ठेवलं होतं. सिनेमात बोल्ड सीन्स देणं. इतकंच नाहीतर ग्लॅमरस फोटोशूटही ती करायची.हीच बाब पति नागा चैतन्य आणि सासरे नागार्जुन यांना या गोष्टी अजिबात आवडत नव्हती,असं म्हटलं जातंय. सामंथाला याविषयी अनेकदा दोघांनी समजवण्याचा प्रयत्न केला होता. अक्किनेनी घराची सून बनल्यानंतर सामंथाने सासू अमाला अक्किनेनीसारखंच वागायला हवं,अशी सगळ्यांची अपेक्षा होती.सामंथाला हा विरोध खटकत होता. अखेर याच कारणामुळे दोघांचा घटस्फोट झाल्याचं मानलं जातंय.