किंग ऑफ तेलगु सिनेमा असं बिरूद अभिनेता नागार्जुनला लावलं जातं. सुरूवातील काही बॉलिवूड सिनेमातही नागार्जूनने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. पण त्यानंतर तो केवळ साऊथ सिनेमात दिसला. पण आज तेलगु सिनेमातील तो सर्वात मोठा स्टार आहे. अर्थातच त्याची लाइफस्टाइलही नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. साऊथमधील असे अनेक स्टार्स आहेत ज्यांची लाइफस्टाइल ही बॉलिवूड अभिनेत्यांना लाजवेल अशी आहे. त्यात नागार्जुनचाही समावेश आहे. नागार्जुनने नुकताच आपला 60 वाढदिवस साजरा केला आहे.
नागार्जुन एक अभिनेताच नाही तर निर्माता आणि बिझनेसमन आहे. साऊथच्या सिनेमांशिवाय तो बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येही दिसला. नागार्जुनच्या अभिनयाबरोबरच लव्ह लाइफचीही बरीच चर्चेत राहिली. नागार्जुनने आपल्या करिअरची सुरुवात 'विक्रम' चित्रपटाने केली. नागार्जुनचे पहिले लग्न 1984 मध्ये लक्ष्मी दग्गुबातीशी झाले होते. पण, लग्नाच्या 6 वर्षातच या दोघांचा घटस्फोट झाला.
त्यांच्या घटस्फोटामागील कारण अमला मुखर्जी सांगितले जाते. अमला आणि नागार्जुनने काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि जेव्हा दोघे अमेरिकेत कामासाठी होते तेव्हा नागार्जुनने आमलाला प्रपोज केला. 1992मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.
अमलाशी लग्न केल्यानंतर नागार्जुनचे बॉलिवूड अभिनेत्री तब्बूसोबतचे अफेअर चर्चेत राहिले. असे म्हणतात की,दोघांचेही नाते १५ वर्षे चालले. अर्थात दोघांचेही लग्न होऊ शकले नाही. याचे कारण म्हणजे, नागार्जुन विवाहित होते.नागागर्जुन विवाहित होते. पण तब्बू त्यांच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, तिने मुंबई सोडून हैदराबादेत नागार्जुन राहायचे अगदी तिथेच घर घेतले होते. तब्बूने अनेक वर्षे नागार्जुन यांची प्रतीक्षा केली. पण नागार्जुन पत्नीला घटस्फोट द्यायला राजी नव्हते. अखेर तब्बूने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आणि २०१२ मध्ये दोघेही कायमचे वेगळे झाले.