Join us

सिनेमांमध्ये हिट ठरलेली नगमा, राजकारणात झाली फ्लॉप, या क्रिकेटपटूसोबत होती अफेअरची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 12:55 PM

इंडस्ट्रीत काम करत असताना अभिनेत्री नगमा(Nagma) यांचे नाव अनेकांशी जोडले गेले होते,

बॉलिवूड अभिनेत्री नगमा(Nagma) यांचा आज वाढदिवस  आहे.. मुंबईत जन्मलेल्या नागमा यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले तेव्हा नावात बदल केला त्यांचे खरे नाव नंदिता मोरारजी आहे. बॉलिवूडबरोबरच अनेक दाक्षिणात्या आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नगमा (Nagma) सध्या अभिनयापासून दूर राजकारणात सक्रिय आहेत.. नगमा यांचे खाजगी आयुष्यही चर्चेत राहिले. इंडस्ट्रीत काम करत असताना त्यांचे नाव अनेकांशी जोडले गेले होते, विशेषतः क्रिकेटपटू सौरव आणि नगमा (Nagma) यांचे नाव तुफान चर्चेत राहिले. व्यतिरिक्त भोजपुरी अभिनेता रवी किशनसह नगमा यांचं नाव जोडले गेले होते. अफेअरमुळे चर्चेत राहिलेल्या नगमा ख-या आयुष्यात मात्र अविवाहीत आहे.

अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेल्या नगमा (Nagma) यांनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला. नगमा यांचे वडील अरविंद प्रतापसिंह मोरारजी एक व्यवसायिक होते. नगमा यांंच्या आईने त्या अभिनेत्री होण्यासाठी पुढाकार घेतला होता.नगमा यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांची आई त्यांच्यासोबत सेटवर जात असे.

नगमा यांनी सलमान खानबरोबर वयाच्या 16 व्या वर्षी बागी चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात केली होती.हा चित्रपट हिट होताच नगमा रातोरात स्टार झाल्या. मात्र, नंतर नगमाची करिअरची गाडी बॉलिवूडच्या रुळावरुन अशी काही घसरली की, फारसे चांगले काम त्यांच्या वाट्याला आले नाही. पाहिजे तसे यश त्या मिळवू शकल्या नाही.

२०१4 च्या लोकसभा निवडणुकीत नागमा यांनी मेरठ-हापूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.आपल्या कारकीर्दीत त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.'सनम बेवफा' 'पोलिस और मुजरीम', 'किंग अंकल' 'सुहाग' 'कुंवर' (2000), 'एक रिश्ता' 'अब तुम्हारे हवाले वतन साथीयों' यासह अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

 

टॅग्स :सलमान खान