नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) ‘झुंड’ (Jhund) या सिनेमाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. दीर्घकाळापासून रखडलेला हा सिनेमा कधी रिलीज होतो, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. तुम्हीही ‘झुंड’ प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, येत्या 4 मार्चला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.नागराज मंजुळे यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर ‘झुंड’चे पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. अमिताभ बच्चन यांनीही याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ‘इस टोली से मुकाबला करने के लिए रहो तैयार. हमारी टीम आ रही है,’ अशा कॅप्शनसह त्यांनी ‘झुंड’ची रिलीज डेट कन्फर्म केली आहे.
सैराट, फँड्रीसारखे तगडे मराठी सिनेमे दिल्यानंतर मराळमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळेने हिंदीत उडी घेतली आणि ‘झुंड’या हिंदी सिनेमाची घोषणा झाली. अमिताभ बच्चन सारख्या महानायकाची या चित्रपटात वर्णी लागली. चित्रपट बनून तयार झाला. पण लॉकडाऊनमुळे अडकला. लॉकडाऊन उठला, पण यादरम्यान ‘झुंड’ कायद्याच्या कचाट्यात अडकला. अर्थात इतके सगळे अडथळे पार केल्यानंतर अखेर ‘झुंड’ची रिलीज डेट कन्फर्म झाली आहे. झुंड नही टीम कहिये, अशी टॅगलाइन असलेला या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी 4 मार्चचा मुहूर्त ठरला आहे. चित्रपटगृहांत हा सिनेमा रिलीज होणार आहे.
नागराज यांचा हा सिनेमा विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. विजय बारसे यांनी गरिब वस्तीत राहणा-या मुलांची फुटबॉल टीम बनवली होती. याचीच ही कथा. हा एक स्पोर्ट ड्रामा आहे.