Join us

एकेकाळी बिग बींचा चित्रपट पाहण्यासाठी नागराज मंजुळेंनी गोळा केले होते पैसे

By शर्वरी जोशी | Published: February 20, 2022 5:43 PM

Amitabh bachchan: उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याचे आज असंख्य मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांचे फॅन आहेत.

'बिग बी', 'शेरशाह', 'बच्चनसाब' अशा एक ना अनेक नावाने ओळखले जाणारा प्रसिद्ध अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन (amitabh bachchan). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याचे आज असंख्य मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांचे फॅन आहेत. यामध्येच दिग्दर्शक, अभिनेता नागराज मंजुळेदेखील (nagraj manjule) बिग बींचे फॅन असल्याचं समोर आलं आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शक 'झुंड' (Jhund) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे आपल्या आवडत्या कलाकारासोबत काम करताना नागराज मंजुळे यांचा अनुभव फार वेगळा होता. अनेकदा त्यांनी त्यांचा हा फॅन मुमेंट मनात दडवून ठेवला होता असं त्यांनी सांगितलं.

कोविड नव्हे 'या' कारणामुळे रखडली होती 'झुंड'ची रिलीज डेट; नागराज मंजुळे यांनी केला खुलासा

 "मी लहानपणापासून अमिताभ बच्चन यांचा चाहता आहे. ज्या वयात मला कळायला लागलं तेव्हापासून मी त्यांचा चाहता झालो. त्यामुळे त्यांचा कोणताही जुना चित्रपट मी पाहिला नाही असं झालं नाही. त्यावेळी चित्रपटाचं तिकीट काढायला पैसे नसायचे. मग आम्ही कधी घरातल्यांकडे हट्ट करुन, कधी लहानसहान कामं करुन जसं जमेल तसे पैसे गोळा करायचो. पण, त्यांच्या चित्रपटांची तिकीटं काढायचो.  काहीही झालं तरी पैशांची तजवीज करुन आम्ही त्यांचा चित्रपट पाहायचो, असं नागराज मंजुळे म्हणाले.

Exclusive:...म्हणून चित्रपटांसाठी नागराज मंजुळे करतात नॉन ग्लॅमरस चेहऱ्यांची निवड

पुढे ते म्हणतात, "मला जो कलाकार आवडतो त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव वेगळा आहे.  झुंडमध्ये मी त्यांना डिरेक्ट करतोय ही गोष्ट माझ्यासाठी खूपच मोठी आहे आणि तितकीच आनंद देणारी सुद्धा."

दरम्यान, येत्या ४ मार्चला झुंड प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे.  

टॅग्स :नागराज मंजुळेअमिताभ बच्चनसिनेमाबॉलिवूडसेलिब्रिटी