विवेक अग्निहोत्री (Vivek Angnihotri) दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट प्रचंड चर्चेत आला आहे. इतकेच नाही तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पाच दिवसांत या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. एकीकडे चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत असताना दुसरीकडे राजकारणही चांगलेच तापलेले आहे. नुकतेच या चित्रपटावरून होणाऱ्या वादावर 'झुंड'(Jhund)चे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी त्यांचे मत मांडले आहे.
एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार, झुंड, कश्मीर फाइल्स आणि पावनखिंड या चित्रपटांवरून सुरू असलेल्या वादावर नागराज मंजुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “एखादा चित्रपट रिलीज झाला आहे. तर तो पाहा आणि मग त्यावर विचार करा. कोंबड्यांच्या झुंजी लावून दिल्यासारखा हा वाद सुरुये. या वादाला काहीच अर्थ नाही. तुमच्या आयुष्यात जर त्याचा काही परिणाम झाला तर चांगली बाब आहे. दिग्दर्शक हा त्याच्या घरी असणार आहे. परंतु तुम्ही थिएटरबाहेर अशी हाणामारी करणे योग्य नाही.
नागराज मंजुळेंची चाहत्यांना केली ही विनंतीते पुढे म्हणाले की, मी फक्त झुंडच बघणार असे म्हणणाऱ्या प्रेक्षकांचे मत देखील मला पटत नाही. तुम्ही सगळे सिनेमे पाहा. अगदी ‘पावनखिंड’ आणि ‘काश्मीर फाइल्स’ हे चित्रपट देखील बघायला पाहिजे. माझ्यावरील प्रेमापोटी झुंड पाहा असे म्हणणाऱ्या लोकांचे देखील मला पटत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे असं काहीही करु नका. रागाने किंवा प्रेमापोटी झुंड चित्रपट पाहा असे अजिबात म्हणू नका.