सोहाला नेटीजन्सने विचारला आरबीआयचा फुलफॉर्म!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2016 1:42 PM
बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान हिने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची बाजू घेतली. पण सोहाने याबाबत टिष्ट्वट करताच ...
बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान हिने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची बाजू घेतली. पण सोहाने याबाबत टिष्ट्वट करताच अनेकांनी सोहाच्या नॉलेजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेकजण सोहाची टर उडवताना दिसले. ‘आरबीआय गव्हर्नर रघूराम राजन यांना बाहेर पडण्यास विवश केले जात आहे. भारतासाठी हे हानीकारक आहे. राजन केवळ त्यांची मदत करू इच्छितात, ज्यांना स्वत:ची मदत करायची आहे. त्यांना हटविणे लज्जास्पद आहे’, अशा आशयाचे टिष्ट्वट सोहोने केले. तिच्या या टिष्ट्वटनंतर सोहा अलीच्या नॉलेजबद्दल लोक नाही, नाही ते बोलताना दिसले. एकाने तर सोहाला आरबीआयचा फुलफॉर्म विचारून टाकला. अर्थात काही जण सोहाची बाजू घेतानाही दिसले.हे कदाचित अनेकांना माहित नसावे...सोहाने एकदम रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरबाबत टिष्ट्वट करावे, याचे अनेकांना आश्चर्य वाटले असावे.(कारण बॉलिवूड कलाकारांना अशा गंभीर व तात्विक मुद्यांवर बोलण्याचा हक्क नाही, असा गैरसमज अनेकजण बाळगून आहेत.) पण अनेकांना माहिती नसावे की सोहा ही लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्सची पदवीधर आहे. सोहाने लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समधून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे. बॉलिवूड अभिनेत्री बनण्यापूर्वी सोहा एक बँकर्स होती, हेही अनेकांना ठाऊक नसावे. कदाचित याच अज्ञानातून अनेकांनी सोहाचे ‘नॉलेज’ काढले असावे??