तनुश्री दत्ताच्या गैरवर्तनाच्या आरोपानंतर नाना पाटेकर यांना ‘हाऊसफुल 4’ हा मोठा सिनेमा हातचा गमवावा लागला. मी माझ्यामुळे इतरांना त्रास देऊ इच्छित नाही, असे सांगत नानांनी या चित्रपटातून अंग काढून घेतले. नाना आऊ्ट झाल्यावर त्यांच्या जागी या चित्रपटात कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार, आता या चित्रपटासाठी अभिनेता अनिल कपूरचे नाव पुढे आले आहे. याशिवाय संजय दत्तचे नावही चर्चेत आहे. होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नानांनी चित्रपट सोडल्यानंतर ‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर किंवा संजय दत्त या दोघांपैकी एकाची वर्णी लागू शकते.‘हाऊसफुल 4’ची सहा दिवसांचे शूटींग नाना पाटेकर यांनी पूर्ण केले होते. आता त्यांच्या वाट्याच्या दृश्यांचे पुन्हा नव्याने शूटींग होणार आहे.‘हाऊसफुल 4’मधून दिग्दर्शक साजिद खानचीही हकालपट्टी झाली आहे. मीटू अंतर्गत साजिद खानवरही लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. यानंतर अक्षय कुमारने साजिद खानसोबत काम करण्यास नकार दिला होता. यापश्चात साजिद खानने स्वत: हा चित्रपट सोडत असल्याचे जाहिर केले होते. साजिदने चित्रपट सोडल्यानंतर आता दिग्दर्शक फरहान सामजी हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. फरहान सामजी यानेच ‘हाऊसफुल 3’चे दिग्दर्शन केले होते.
‘हाऊसफुल 4’मध्ये नाना पाटेकर यांच्याजागी लागू शकते ‘या’ अभिनेत्यांपैकी एकाची वर्णी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 19:14 IST