सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत असून यंदाच्या लोकसभा निवडणूक मराठी चित्रपटसृष्टीतील कोण कोण कलाकार निवडणुकीत उभे राहणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. यंदा डॉ. अमोल कोल्हे व उर्मिला मातोंडकर निवडणूक लढवणार आहेत. त्यात अभिनेते नाना पाटेकर देखील निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र याबाबतचा खुलासा नाना पाटेकर यांनी सोशल मीडियावर केला आहे.नाना पाटेकर यांनी सांगितले की, 'नाम फाऊंडेशनच्या कामा निमित्त गावोगावी फिरताना अनेक लोक भेटायला येतात आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात. काही मंडळी अशा फोटोंचा गैरवापर करीत आहेत. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला मी पाठिंबा दिलेला नाही'. नाना यांनी ट्विटवर आपण निवडणूक लढवत नसल्याचे सांगून चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
नाना पाटेकर यांनी निवडणूक लढवण्याबाबत केला खुलासा, म्हणाले की...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 2:41 PM