Tanushree-Nana Controversy: अखेर नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताला पाठवले कायदेशीर नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 07:22 PM2018-09-28T19:22:36+5:302018-09-28T19:23:09+5:30

तनुश्री दत्ताचे केलेले आरोप नाकारल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी आज तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवले. नाना पाटेकर यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी एएनआयशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

nana patekar files legal notice against tanushree dutta seeking an apology for making false statements | Tanushree-Nana Controversy: अखेर नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताला पाठवले कायदेशीर नोटीस!

Tanushree-Nana Controversy: अखेर नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताला पाठवले कायदेशीर नोटीस!

googlenewsNext

तनुश्री दत्ताचे केलेले आरोप नाकारल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी आज तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवले. नाना पाटेकर यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी एएनआयशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तनुश्री दत्ताने लावलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. आम्ही तनुश्री दत्ताला नोटीस पाठवणार आहोत. आज प्रामुख्याने तनुश्रीने जे काही आरोप लावलेत, त्यासाठी माफी मागण्याची मागणी करणारी नोटीस आम्ही पाठवणार आहोत, असे शिरोडकर यांनी सांगितले. काल तनुश्रीच्या आरोपांवर मौन सोडत नाना पाटेकर यांनी तिचे सगळे आरोप खोडून काढले होते.सेटवर १००-२०० लोक हजर होते. या सर्वांसमोर मी तिच्यासोबत गैरवर्तन केले, असे ती का म्हणतेय, मला ठाऊक नाही़ शेवटी कुणी काय बोलाव, हे मी कसे ठरवणार. मी फक्त एवढेचं सांगेल की, कुणी काहीही म्हणो, मला माझ्या आयुष्यात जे करायचे तेच मी करणार, असे नाना पाटेकर ‘ मिरर  नाऊ’ सोबत बोलताना म्हणाले. या प्रकरणात तनुश्रीविरोधात कायदेशीर कारवाई करणार का, या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी टाळले. बघूया, मला जे करायचे ते मी करणार, केवळ एवढेच ते बोलले होते.

इमरान हाश्मी स्टारर ‘आशिक बनाया आपने’ची हिरोईन तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. ताज्या मुलाखतीत तनुश्रीने २००८ सालचे एक प्रकरण पुन्हा एकदा उखरून काढत, नानांवर गंभीर आरोप केले आहेत. २००८ साली ‘हॉर्न ओक प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले होते आणि मनसेकडून धमकावले होते, असा तनुश्रीचा आरोप आहे.

Web Title: nana patekar files legal notice against tanushree dutta seeking an apology for making false statements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.