मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठा चाहता वर्ग असलेले अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी अनेक उत्कृष्ट कलाकृती सिनेसृष्टीला दिल्या आहेत. नाना पाटेकरांनी अभिनयाबरोबर आपल्या स्पष्टवक्तेपणाने आणि साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाना पाटेकर यांचे बॉलिवूमध्ये सर्वांशी चांगले संबंध आहेत. पण, एका लोकप्रिय अभिनेत्याशी नाना पाटेकर यांचे जवळचे संबंध आहेत.
नाना पाटेकर यांचा 'वनवास' चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आलायं. नुकतंच या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग मुंबईत ठेवण्यात आलं होतं.यावेळी नाना पाटेकर यांनी बी टाऊनच्या प्रसिद्ध अभिनेत्याला आमंत्रित केलं होतं. तो अभिनेता म्हणजे आमिर खान.आमिर खान आणि नाना पाटेकर खूपच घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे वनवासच्या टीमने बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टसाठी मुंबईत खास स्क्रिनिंगची व्यवस्था केली.
अनिल शर्मा दिग्दर्शित वनवास या चित्रपटात वडील आणि मुलाची अतिशय भावनिक कथा दाखवण्यात आली आहे. खरी नाती रक्ताची नसून प्रेमाची असतात, हे या कथेतून सांगण्यात आलं आहे. वनवास चित्रपट हा भावनांचा आरसा आहे. या सिनेमात नाना पाटेकर यांच्याशिवाय, 'गदर २' फेम उत्कर्ष शर्मा हा कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. अनिल शर्मा यांनी सिनेमाची निर्मिती तर केलीच आहे; शिवाय दिग्दर्शन आणि लेखनही त्यांनीच केलं आहे.