नाना पाटेकर (Nana Patekar) यांना कोणत्याच परिचयाची गरज नाही. दमदार अभिनय आणि एक उत्तम माणूस असणाऱ्या नाना पाटेकर यांचा फॅन फॉलोव्हिंग प्रचंड आहे. अनेकदा नानांचे बरेच किस्से ऐकायला मिळत असतात. नाना यांचे फिल्मी करिअरसोबत त्यांचे खासगी आयुष्यही खूप चर्चेत असते. फार कमी लोकांना नाना पाटेकर यांच्या पत्नीबद्दल माहित आहे. त्या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांचे नाव आहे निलकांती पाटेकर (Nilkanti Patekar). मात्र नाना पाटेकर कित्येक वर्षांपासून पत्नीपासून वेगळे राहतात. दरम्यान आता एका मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलंय.
नाना आणि निलकांती यांची पहिली भेट थिएटरमध्ये झाली होती. त्या नाटकात काम करायच्या आणि बँकेत काम करत होत्या. त्यावेळी ते महिन्याला १५ थिएटर शो करायचे आणि त्यांना प्रत्येक शोसाठी ५० रुपये मिळायचे. निलकांती यांना महिन्याला २५०० रुपये पगार होता. निलकांती नानांच्या प्रेमात असल्यामुळे त्यांच्यावर या गोष्टीचा काहीच फरक पडला नाही. नानांसोबत लग्न केल्यानंतर निलकांती सचिन पिळगावकर यांच्या आत्मनिर्भर या मराठी चित्रपटात काम केले. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. पण यानंतर त्या चित्रपटांपासून दुरावल्या.
''माझ्यावर तिचे खूप उपकार आहेत''
नाना पाटेकर यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ते जेव्हा सिनेइंडस्ट्रीत आले तेव्हा त्यांनी त्यात स्वत:ला झोकून दिले होते. त्यावेळी त्यांना निलकांती यांनी खूप पाठिंबा दिला. याबद्दल नाना म्हणाले की, तिने मला म्हटले की तुम्हाला करिअर करायचं असेल तर करा, माझ्या पगारातून पैसे येतात. माझ्यावर तिचे खूप उपकार आहेत. तिच्यामुळेच मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो. यश मिळेल की नाही हे त्यावेळी माहीत नव्हते. परंतु तिने माझ्यावर विश्वास ठेवला.
नाना पाटेकर पत्नी आणि कुटुंबापासून राहतात वेगळेकुटुंबापासून वेगळे राहण्यामागचे कारण सांगताना नाना पाटेकर म्हणाले की, मल्हार होता, माझी आई होती, त्यामुळे तिने काम केले नाही. मी वेगळा राहायचो, ते एकत्र राहायचे. आई, मल्हार आणि निलकांती एकत्र राहायचे आणि मी एकटाच वेगळा राहत होतो.