Join us

नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील हा किस्सा वाचल्यावर वाटेल त्यांच्याविषयी अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 7:31 PM

नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. ते खूपच चांगले अभिनेते आहेत. पण त्याचसोबत ते एक खूप चांगले मित्र देखील आहेत.

ठळक मुद्देकाही वर्षांपूर्वी एन चंद्रा यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड ढासळली होती. त्यांची परिस्थिती पाहाता नाना पाटेकर यांनी स्वतःचे घर गहाण ठेवून त्यांना आर्थिक मदत केली होती.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचा आज 69 वा वाढदिवस. हिंदी, मराठी, तामिळसह अनेक भाषांमधील चित्रपटात दमदार भूमिका करणारे नाना यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. पण अर्थातच हे सगळे त्यांना सहजी मिळाले नाही. यासाठी त्यांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला. त्यांनी आज मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. 

नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. ते खूपच चांगले अभिनेते आहेत. पण त्याचसोबत ते एक खूप चांगले मित्र देखील आहेत. त्यांनी आपल्या एका मित्राच्या मदतीसाठी चक्क घर गहाण ठेवले होते. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक एक चंद्रा आणि नाना पाटेकर यांची अनेक वर्षांपासूनची घट्ट मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी एन चंद्रा यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड ढासळली होती. त्यांची परिस्थिती पाहाता नाना पाटेकर यांनी स्वतःचे घर गहाण ठेवून त्यांना आर्थिक मदत केली होती. काही महिन्यांनी एन चंद्रा यांची परिस्थिती सुधारल्यावर त्यांनी ते पैसे परत केले होते. त्याचसोबत नाना यांना स्कूटर भेट म्हणून दिली होती. यावरून नाना आपल्या मित्रांसाठी काहीही करू शकतात हे सिद्ध झाले होते.

नाना पाटेकर यांच्या अग्निसाक्षी, क्रांतीवीर या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्यांना आजवरच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले असून त्यांच्या अभिनयाचे अनेक फॅन्स आहेत. बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. आज त्यांनी क्रांतीवीर, वेलकम, परिंदा, अग्निसाक्षी, राजू बन बया जंटलमॅन, तिरंगा, अपहरण यांसारख्या अनेक हिंदी तर नटसम्राट, सिंहासन, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटेः द रिअल हिरो, आपला मानूस यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :नाना पाटेकर